मुंबई
लोकलमधील अपंग डब्ब्यात चढणे पडले तरुणाला महागात
ठाण्यात महागड्या मोबाईलवर डल्ला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : जलद लोकलच्या अपंग डब्यातून २४ वर्षीय तरुणाचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. तब्बल एक लाख ३६ हजार रुपये किमतीचा आयफोन १६ प्रो मॅक्स मोबाईल चोरट्याने लांबवला आहे. ही घटना मंगळवारी (ता. २३) ठाण्यातील फलाट पाचवर घडली. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुण मंगळवारी कामावरून घरी अंबरनाथ येथे जाण्यासाठी ठाणे रेल्वेस्थानक फलाट क्रमांक पाचवर बदलापूर फास्ट लोकलमध्ये चढला. यानंतर खिशातील मोबाईल फोन चेक केला असता तो मिळून आला नाही. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.