एसटी बँकेची ‘ड’ दर्जावर घसरण

एसटी बँकेची ‘ड’ दर्जावर घसरण

Published on

एसटी बँकेची ‘ड’ दर्जावर घसरण
सीडी रेशाे ९२ वर; प्रशासकीय मनमानीचा फटका
नितीन जगताप : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : आशिया खंडातील कर्मचाऱ्यांची सर्वोत्तम सहकारी बँक म्हणून नावारूपास आलेल्या एसटी बँकेची अधोगती सुरू झाली आहे. नुकत्याच आलेल्या वार्षिक अहवालातील आकडे धक्कादायक असून, बँकेतील अर्ध्याहून अधिक ठेवी काढण्यात आल्या असल्याचे उघड झाले आहे. यामुळे बँकेचा क्रेडिट-डिपॉझिट रेशो ९२वर गेल्याने दर्जा ‘अ’वरून ‘ड’पर्यंत घसरला आहे. या अधाेगतीला प्रशासकीय मनमानी कारणीभूत असल्याचा आराेप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या या बँकेच्या राज्यभरात ५० शाखा आहेत. या बँकेतून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन केले जाते. अडीच वर्षांपूर्वी या बँकेची आर्थिक स्थिती चांगली होती. या बँकेत दीड वर्षांपूर्वी २,३०० कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. जून २०२३मधील निवडणुकीत या बँकेवर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचे पॅनेल निवडून आले. या पॅनेलने सभासदांना कर्जावरील व्याजदर ११ टक्क्यांवरून ७.५ टक्के करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तास्थापनेनंतर त्याची पूर्तता करण्यात आली. त्यानंतर बँक अडचणीत येण्याच्या शक्यतेने सुमारे ठेवीदारांनी बँकेतील ५०० कोटींच्या ठेवी काढून घेतल्या. यामुळे तत्कालीन संचालक मंडळाला व्याजदर कपातीचा निर्णय मागे घ्यावा लागला हाेता.

इशाऱ्यांकडे बॅँक प्रशासनाचे दुर्लक्ष
एसटी बँकेतील २,३०० कोटींच्या ठेवी १,७०० कोटींवर आल्या आहेत. त्यामुळे बँकेतील क्रेडिट-डिपॉझिट रेशो (सीडी रेशो) ९२ टक्क्यांवर गेला. म्हणजेच बँकेतील १०० रुपयांच्या ठेवीपैकी तब्बल ९४ रुपयांचे कर्ज दिले गेले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमाचे उल्लंघन केल्यामुळे बँकेला एक कोटीहून अधिक रकमेचा दंड केला आहे. या अनियमिततेवर रिझर्व्ह बँक आणि सहकार खात्याने वारंवार ताशेरे ओढले आहेत; तरीही बँक प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आराेप हाेत आहे.
==
बँक अडचणीत येण्याची कारणे
- १२७ कर्मचाऱ्यांची बेकायदा भरती
- ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात ठेवी काढून घेतल्या
- क्रेडिट रेशो ९२ पर्यंत गेला
- रिझर्व्ह बँकेने ‘अ’वरून ‘ड’ दर्जा
- एक कोटीपेक्षा जास्त रकमेचा दंड
- संगणक खरेदीत गैरव्यवहाराचा संशय
==
शासनाने नेमलेल्या शहाजी पाटील समितीने बँकेच्या कारभाराविषयी गंभीर ताशेरे ओढले; मात्र काहीच कारवाई झाली नाही. अ वर्गातील बॅंक ड वर्गात गेली आहे. आरबीआयने कोट्यवधींचा दंड आकारला आहे. एक दिवस एसटीबाहेरचे हे सभासद बॅंक लुटून फरारी होतील.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, एसटी कामगार संघटना
==
एसटी बँकेचा नियमबाह्य कामकाजावर सहकार आयुक्त आणि रिझर्व्ह बँकेने वारंवार ताशेरे ओढून बँकेचे अध्यक्ष माधव कुसेकर यांना कारवाई करण्यास सांगितले आहे; मात्र त्यांनी आजपर्यंत कुठलीच कारवाई केली नाही. हे सर्व राजकीय दडपणाखाली होत आहे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, एसटी कर्मचारी काँग्रेस
==
व्हर्च्युअल गॅलक्सी डेटा सेंटरसाठी अंदाजपत्रक १४ कोटींचे हाेते; मात्र त्याचा कार्यादेश ५९ कोटींपर्यंत गेला आहे. व्यवस्थापकीय संचालकांना विचारात न घेता निर्णय घेण्यात येत आहे.
- धीरज तिवारी, संचालक, एसटी को-ऑपरेटिव्ह बँक
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com