ठाण्यात नवरात्राेत्सवामुळे वाहतूककाेंडी
ठाण्यात नवरात्राेत्सवामुळे वाहतूककाेंडी
प्रवासी बस, रिक्षाच्या तासन्तास प्रतीक्षा; अंतर्गत रस्ते, घोडबंदर मार्ग जॅम
ठाणे शहर, ता. २५ (बातमीदार) : नवरात्राेत्सवाच्या चौथ्या दिवशी पावसाने उघडीप दिल्यामुळे माेठ्या प्रमाणावर गरबाप्रेमी बाहेर पडले. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर प्रचंड वाहतूककाेंडी झाल्याचे पाहायला मिळाले. गल्लीबाेळातील रस्त्यांसह घाेडबंदर मार्गावर वाहनांची गर्दी झाली. यात ठाणे स्थानकाकडे जाणाऱ्या रिक्षा, बस या काेंडीत अडकल्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना रिक्षा, बसची तासन्तास वेळ ताटकळत राहावे लागले. ठाण्यात सर्वत्र कोंडी झाल्याने ठाणेकरांत संतापाचे वातावरण पाहायला मिळाले.
ठाण्यातील टेंभीनाका हा मध्यवर्ती भागातील महत्त्वाचा परिसर आहे. सद्या येथे नवरात्र उत्सवानिमित्त रस्त्यावर जत्रा भरली आहे. देवीच्या दर्शनासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकाकडून घोडबंदर, कळव्याकडे जाणारी वाहतूक इतर रस्त्यांनी वळविण्यात आली आहे. त्याचा फटका खोपट आणि वंदना परिसरातील रस्त्यांना बसत आहे. लालबहादूर शास्त्री मार्ग ११ वाजेपर्यंत कोंडीत सापडला होता. त्याचा फटका घोडबंदर वाहतुकीलादेखील बसला आहे. बाजारातील वाहतूक बंद केल्याने ठाणे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवासी बस आणि रिक्षांची संख्या प्रचंड कमी झाली. परिणामी कामावरून घरी जाण्यासाठी नागरिकांना घरी जाण्यासाठी वाहन मिळेनासे झाल्याने प्रवाशांना त्याचा त्रास झाला. घोडबंदर मार्गांवरदेखील रात्री १०:३० पर्यंत लहान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक धिम्या गतीने सुरू असल्याने लोकांना घरी पोहाेचण्यासाठी वेळ लागला. ठाण्यातील कोंडीबाबत वाहतूक उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी विचारले असता ठाणे स्थानकाकडे जाणारी वाहतूक खोपट मार्गाने वळविली असल्याने या मार्गावर रात्री ११ वाजेपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. जादाचे पोलिस बळ लावून ही कोंडी नियंत्रणात ठेवण्यात आली असल्याचे सांगितले. इतर काही मार्गांवर नवरात्री उत्सवाचे कार्यक्रम सुरू असल्याने त्या ठिकाणी थोडी कोंडी झाली होती, तीदेखील वाहतूक कर्मचाऱ्यांनी नियंत्रणात ठेवली होती.
---
कोंडीचा यांना बसला फटका
: घरी जाण्यासाठी रिक्षा, बस न मिळाल्याने प्रवाशांना बाजारातून पायी जावे लागले. रिक्षाचालकांकडून जादाचे भाडे आकारण्यात आल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. जवळचे आणि गर्दीच्या रस्त्यावरचे भाडे नाकारण्यात आल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
---
या ठिकाणी काेंडी
स्थानिक वाहन चालकांकडून विरुद्ध दिशेने वाहने चालवल्याने कोंडीत आणखी भर पडली. खोपट, कॅसेल मिल, नौपाडा येथील अंतर्गत रस्त्यांवर बांधण्यात आलेल्या पुलांवर कोंडी झाली हाेती.
नवरात्र उत्सवाच्या ठिकाणी बाजार मांडून बसललेल्या फेरीवाल्यांनी फुटपाथ अडवल्याने वाहनांच्या कोंडीतून लोकांना मार्ग काढावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.