भाजी निर्जलीकरणातून लाखोंची उलाढाल

भाजी निर्जलीकरणातून लाखोंची उलाढाल

Published on

भाजी निर्जलीकरणातून लाखोंची उलाढाल
उमा कुसमुडे यांच्या ‘न्यूट्री लॉक’मुळे महिलांना रोजगार
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. २७ ः हिरव्या पालेभाज्या लवकर खराब होतात. त्यामुळे साठवण, वाहतूक, विक्री करणे कठीण जाते. त्यामुळे भाज्या निर्जलीकरणाच्या व्यवसायातून खारघर येथील उमा कुसमुडे यांनी महिलांना रोजगार दिला आहे.
भाजीपाला पिकांचे उत्पादन होऊनही योग्य साठवणूक आणि प्रक्रिया करण्याच्या सुविधा नसल्यामुळे त्यातील बराचसा भाग खराब होतो. ही समस्या टाळण्यासाठी भाज्या सुकवण्याचे तंत्र खूप उपयुक्त ठरू शकते. भाज्यांमध्ये जीवनसत्त्व, खनिजे आणि ऊर्जादायक घटक असतात; पण अशा भाज्या लवकर खराब होत असल्याने आहारात अनेकदा वापरता येत नाही. त्यामुळे निर्जलीनीकरणानंतर भाज्यांचे आयुर्मान वाढण्यासाठी उमा कुसमुडे यांनी भाज्या, फळांमधील पाणी काढून त्याचे मार्केटिंग, विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आखाती देशांमध्ये त्यांची उत्पादने निर्यात केले जातात. तसेच वेगवेगळ्या ॲपद्वारे त्याची विक्री होते.
----------------------
पुरणाला मागणी
न्यूट्री लॉकमध्ये पुरणाचे सर्वाधिक जास्त उत्पादन निर्मिती होते. ही प्रक्रिया मोठी असल्याने महिला इच्छा असताना पुरणपोळ्या बनवू शकत नाहीत. उमा कुसमुडे यांनी निर्जलीकरण केलेले पुरणाला बाजारात मागणी आहे. गरम पाण्यात सुकवलेले पुरण टाकल्यानंतर पाच मिनिटांत गृहिणी पुरणपोळ्या करू शकतात. परदेशात मोठ्या प्रमाणात पुरण पाठवले जाते.
----------------------
राज्यभरात विक्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक स्टेशन एक उत्पादन’ या संकल्पनेनुसार लोकमान्य टिळक रोड रेल्वेस्थानकात अनिता जाधव यांचा स्टॉल आहे. या ठिकाणी कुसमुडे यांनी तयार केलेली उत्पादने विकले जातात. जळगाव येथे रागिनी खडके, वसईत सुविधा खैरे, पुणे-नाशिकला द्वारका चव्हाण त्याचबरोबर गोव्यात मीओमोर कॅफेमध्ये मिशी भटनागर उत्पादनाची विक्री करतात.
-----------------------------
भाज्या, फळे सुकवल्यानंतर त्यांचे आयुर्मान वाढते. निर्जलीकरणामुळे वर्षभर भाज्या खाऊ शकतो. त्याच्यातील जीवनसत्त्व कायम ठेवून उत्पादने तयार केली जातात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या भाज्या चांगल्या असतात.
- उमा कुसमुडे, संचालक, न्यूट्री लॉक कंपनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com