वाकडाई देवीच्या दर्शनाला रिघ

वाकडाई देवीच्या दर्शनाला रिघ

Published on

वाकडाई देवीच्या दर्शनाला रिघ
नवरात्रोत्सवात माणगावच्या ग्रामदैवतेचा जागर
माणगाव, ता.२७ (वार्ताहर)ः ग्रामदैवता श्री वाकडाई देवीच्या दर्शनाला पंचक्रोशीत नावलौकिक आहे. गावाच्या वेशीवर काळनदी किनारी असलेल्या देवीच्या मंदिरात दर्शनासाठी घटस्थापनेपासूनच भाविकांची मोठी रिघ लागते.
नवरात्रोत्सवात नऊ दिवस देवीचे रुप साजशृंगार, सुवर्णालंकार, हिरव्या रंगाची साडी आणि गोंडा-रानभेंडीसह पिवळ्या, भगव्या, पांढऱ्या फुलांनी सजवलेले चांदीच्या मखरातील तेजोमय रूप पाहून भाविकांना समाधान लाभते. प्रत्येक शुभकार्याची सुरुवात माणगांवकर देवीच्या चरणी नतमस्तक होऊनच करतात. तालुक्यातील तीन देवता माहेरवासिनी भगिनी मानल्या जातात. त्यापैकी कडाप्याला गेलेली कालकाई, दुसरी पाणसईला गेलेली सोमजाई आणि तिसरी उतेखोलाला असलेली श्री आई वाकडाई देवी आहे. देवीच्या पाणवठ्यावर (घाड-शेल) पाषाणाला शेंदूर लावण्याची परंपरा आजही पुजारी मढवी-समेवर यांच्यावतीने केली जाते.
------------------------------------------------
जंगलनिवासिनी म्हणून ओळख
जंगलनिवासिनी म्हणून ही देवी ओळखली जाते. घनदाट वनराई, शांत परिसर आणि वनचरे हे मंदिराजवळ सहज दिसते. देवीच्या मूर्तीसमोर दोन लाकडी खांब, त्यावर आडवा भाल, पितळेच्या घंटा, कौलारू छप्पर असे साधे स्वरूप आहे. ग्रामस्थांनी अनेक वेळा कळा लावून प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर देवीने उजवा कळा दिला, अशी आख्यायिका आहे. दाक्षिणात्य शैलीत भव्य मंदिर उभारण्यात आले. गोलाकार घुमट, प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच काळभैरी, बापुजी देवतांची मंदिरे जोडून एक भव्य मंदिर संकुल तयार झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com