गिरणी कामगार घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार
गिरणी कामगार घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार
- सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची ग्वाही
शिवडी, ता. २८ (बातमीदार) ः गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लागावा, यासाठी बैठक बोलविण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, अशी ग्वाही राज्याचे सहकार आणि गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
गिरणी कामगारांमध्ये गेली ५० वर्षे कार्यरत असलेल्या राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघाचा सुवर्णमहोत्सव सोहळा डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २६) दीपप्रज्वलनाने पार पडला. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा सहकार विभाग म्हणून कार्यरत असलेल्या संस्थेचा हा कौतुक सोहळा संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या उपस्थितीत परळ पूर्वेतील महात्मा गांधी सभागृहात पार पडला.
अध्यक्षस्थानी सहकारी ग्राहक संघाचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते होते. गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या मागण्यांची अंमलबजावणी त्वरित व्हावी यासाठी मंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घ्यावा, असा आग्रह लढा समितीचे प्रमुख सचिन अहिर यांनी निवेदनाद्वारे मंत्रीमहोदयांकडे केला.
याप्रसंगी गिरणी कामगारांच्या घरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे सांगून राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, हे आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष आहे. आपल्याला सहकाराकडून समृद्धीकडे जायचे आहे. व्यापारी, सामान्य ग्राहकांच्या मुख्य अडचणी सोडवण्याला प्राधान्य द्यावे लागेल. शहरापेक्षा ग्रामीण भागातील सहकारी संस्थांना मोठ्या हलाखीच्या परिस्थितीतून जावे लागत आहे. या गोष्टींकडे लक्ष वेधून त्यांच्या पुनर्विकासाचे काम हाती घ्यावे लागेल, असेही सांगितले.
दरम्यान, गेल्या ५० वर्षांतील कार्यकर्ते, आजी-माजी संचालक, कर्मचारी यांचा शाल, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. महोत्सव सोहळा महाव्यवस्थापक विलास डांगे यांच्या कुशल सहकार्याने, तर सूत्रसंचालन ग्राहक संस्थेचे खजिनदार बजरंग चव्हाण यांनी केले. उपाध्यक्ष रघुनाथ शिरर्सेकर, संचालक निवृत्ती देसाई, मारुती शिंत्रे, सुनील बोरकर, शिवाजी काळे, बळीराम महाडिक, मनोहर पाटील, स्मिता शिंदे, सुनिता खराटे अदी संचालकांनी सभेच्या कामकाजात भाग घेतला.
सहकार चळवळ टिकवणे गरजेचे
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर म्हणाले की, सहकारी चळवळ आर्थिक सबळता, सामाजिक एकता आणि कामातील एकाग्रता या प्रामुख्याने तीन घटकांवर अवलंबून असते. आज सहकार चळवळ वाढविण्यापेक्षा टिकविणे महत्त्वाचे ठरले आहे. तेव्हा सहकारी संस्थांना एकत्र येऊन आपल्या अस्तित्वासाठी लढावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.