धारावी सहकारी पतपेढीची वार्षिक सभा
धारावी सहकारी पतपेढीची वार्षिक सभा
धारावी, ता. २७ (बातमीदार) : धारावी सहकारी पतपेढी (मर्या.)ची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. धारावी मुख्य रस्त्यावरील धारावी कोळी जमात सभागृह येथे या सभेचे आयोजन केले होते. या वेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. धारावीतील गोरगरीब व गरजू कुटुंबांना १९८०च्या दशकात अडीअडचणीला पैशांची गरज भासल्यास खासगी सावकारांकडे धाव घ्यावी लागत होती. त्यामुळे अनेक कुटुंबे त्या वेळी अडचणीत आली होती. या पार्श्वभूमीवर धारावीतील शिक्षित तरुणांनी एकत्र येत १९८५ साली एकत्र येऊन अशा गरीब, गरजू व अडलेल्या-नडलेल्या लोकांना कमी व्याजदरात कर्ज देणारी व्यवस्था उभारण्याचे ठरले. त्यानुसार पतपेढी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले. १९८७ साली ‘धारावी संज्ञकारी पतपेढी’ची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. धारावीत मुख्य कार्यालय तसेच धारावीतच एक शाखा त्याचसोबत सायन, चेंबूर व मानखुर्द येथे शाखा निर्माण केल्या आहेत. अशा मिळून चार शाखा आहेत. आज पतपेढीचे २० हजार ५७८ सदस्य असून, खेळते भांडवल ४६ कोटींचा टप्पा पार करून गेले असल्याचे चेअरमन ॲड. प्रदीप कदम यांनी सांगितले. या वेळी अपना सहकारी बँक माजी संचालक सुहास बने, पतपेढीचे मालोजी होनकळस, गणेश नारायणकर, दीपक खंदारे आदी सभेला उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.