कॉलम

कॉलम

Published on

मैत्री फाउंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना सायकल
विरार (बातमीदार) : शाळेत जाण्या-येण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठलेही साधन नसल्याने रोज तीन ते चार किमी पायी प्रवास करावा लागतो. ही गैरसोय लक्षात घेऊन बोरिवलीतील मैत्री फाउंडेशनचे संस्थापक राजेश त्रिवेदी यांच्यातर्फे सायकल वाटप करण्यात आले. सद्‍गुरु सामळनाथ महाराज, गुरु बालकनाथ महाराज यांच्या जन्मशताद्बीनिमित्त विक्रमगड, मोखाडा तालुक्यातील १०० विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन जूचंद्र येथील शिव छत्रपती समाज सेवा मंडळाने केले. मैत्री फाउंडेशनचे विश्वस्त वेदांत राजेश त्रिवेदी, पियांशू त्रिवेदी, पियुष पटेल यांच्या हस्ते विक्रमगडच्या आंबेघर येथील विद्यादान विद्यामंदिरातील ४०, मोखाडा तालुक्यातील आदिवासी हायस्कूल मोऱ्हांडा, वाशाला, पोशेरा येथील प्रत्येकी २० विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. तर, शिव छत्रपती समाज सेवा मंडळातर्फे मोऱ्हांडा हायस्कूलला लॅपटॉप भेट देण्यात आले. या कार्यक्रमास सेवा मंडळाचे संस्थापक पुरुषोत्तम पाटील, विद्याधर म्हात्रे, नारायण म्हात्रे, किशोर पाटील, सुरज भुसारा, तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पोशेरा हायस्कूलचे चेअरमन, सभासद, सरपंच उपस्थित होते.
---
विवा महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेची प्राथमिक फेरी
विरार (बातमीदार) : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय व एआयसीटीई, एमओयू इनोव्हेशन सेल, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन आणि विवा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विवा महाविद्यालयातील आयटी-सीएस डीएस, आयसिटी क्लब, आयक्यूएससी यांच्यासमवेत हॅकेथॉन २०२५ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण १८ संघ व १०८ विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदवली. या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून चांदणी पटेल, विदुला पाटील, रोहित किनी, प्रांजल काटकर यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, आयक्यूएससी समन्वयक डॉ. रोहन गवाणकर, डॉ. अनुश्री किणी, आयटी-सीएस-डीएस विभागाचे प्रमुख डॉ. संपदा देशमुख, डॉ. बिनिता ठक्कर, अनुजा पाटील, श्वेता यंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
--------------------
जिल्हा समन्वयकपदी नितीन वाडेकर यांची वर्णी (बातमीसाठी फोटो आहे.)
विक्रमगड (बातमीदार) ः सामाजिक कार्यकर्ते नितीन दत्तात्रय वाडेकर यांची नुकतीच शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना-पालघर जिल्हा समन्वयक पदी निवड झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार श्रीकांत शिदे यांचे मार्गदर्शनानुसार एक वर्षाच्या कालवधी करीता ही निवड करण्यात आली आहे.
नितीन वाडेकर हे पक्षाचे क्रियाशील सदस्य आहेत. त्यांनी यापुर्वी देखील समाज कार्याच्या बळावर अनेक पदांवर काम केले आहे. प्रशासनाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. अनेक सामाजिक लढ्यात त्यांनी अनेकवेळा हिरीहीरिने भाग घेतला आहे. त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदाचा वर्षाव केला जात आहे.
----
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय परिषदेवर दिलीप कोरे यांची निवड (बातमीसाठी फोटो आहे.)
विरार (बातमीदार) ः राज्य ग्रंथालय परिषदेवर कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दिलीप कोरे यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीमुळे कोकण विभागाबरोबरच राज्यातील ग्रंथालय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रंथालय सेवकांनी आनंद व्यक्त केला.
राज्य ग्रंथालय परिषद ही महत्वाची समिती असून सुमारे १९ वर्षानंतर ही समिती गठीत झाल्यामुळे तिला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या समितीचे अध्यक्ष हे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील असतील. या समितीमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मुख्य सचिव वेणुगोपाळ रेड्डी, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, राज्य ग्रंथालयचे अध्यक्ष गजानन कोटेवार, अमरावतीचे प्रभाकर घुगे, मराठवाड्याचे खंडेराव सरनाईक, नाशिकचे प्रा.डॉ. दतात्रय परदेशी, पुण्याचे विजय कोलते, नाथाबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचे संचालक डॉ. सुभाष चव्हाण, ग्रंथालय भारतीचे केंद्रीय कार्यवाह सुनील वायाळ, डॉ. सिद्धी जगदाळे यांच्याबरोबर चार आमदारांचाही समावेश असेल. या समितीमुळे वाचन चळवळीला बळ मिळेल, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
----
पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती आयटीआय विक्रमगड येथे साजरी
विक्रमगड (बातमीदार) ः औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) विक्रमगड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रेरणादायी व्याख्याने, कर्मचारी व विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयटीआय विक्रमगडचे गट निर्देशक गवळी होते. त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय या समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या उन्नतीच्या विचाराचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व प्रमुख वक्ते आयटीआय विक्रमगडचे आयएमसी सदस्य संतोष हडबाळ यांनी व्याख्यान दिले.
वीजतंत्री विभागातील प्रशिक्षणार्थी राजश्री गवारी हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवन कार्याविषयी आपले विचार व्यक्त केले.
----
नालासोपारा मेडिकल असोसिएशनच्या आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद (कॉलमसाठी फोटो बातमी)
विरार (बातमीदार) ः विरार पूर्वेकडील बेलवंडी आश्रम शाळेतील मुलांसाठी शनिवारचा (ता. २७) दिवस विशेष ठरला. शनिवारी (ता. २७) नालासोपारा मेडिकल असोसिएशनच्या जवळपास ५५ डॉक्टरांच्या टीमने आश्रम शाळेतील जवळपास ६५० विद्यार्थांच्या आरोग्याची तपासणी केली.
या आरोग्य शिबिरात विद्यार्थ्यांबरोबर तेथील काही नागरिकांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली. याचवेळी विद्यार्थ्यांना असोसिएशनच्या वतीने मोफत औषधांचाही पुरवठा करण्यात आला. हे शिबीर जनजागृती आणि आशा देण्याचं एक ध्येय होतं, असे मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन पाटील यांनी सांगितले. या शिबिरात
हिमोग्लोबीन चाचणी, दातांच्या समस्या आदींसारख्या आजारांची तपासणी करून त्यांना औषधे आणि समुपदेशन करण्यात आले. यासोबतच मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष डॉ. सचिन पाटील, डॉ. सूरज गायकवाड, डॉ. सचिन भिरुड, डॉ. संजय मांजलकर, डॉ. सुरेश पाटील, डॉ. हेमंत सरवरे, डॉ. तन्मय दांडेकर, डॉ. नीलेश वानखेडे, डॉ. निलेश जाधव, डॉ. प्रशांत होतकर, डॉ. सचिन गायधनकर, डॉ. संदीप चौधरी, डॉ. मनोज खडसे, डॉ. रेनुका पाटील, डॉ. स्मिता चव्हाण, डॉ. प्रेरणा मांजलकर, डॉ. आशा मुंढे, डॉ. सिबल दिब्रिट्टो या डॉक्टरांनी सहकार्य केले.
---
मोखाड्यातील तरुणी बेपत्ता
मोखाडा, ता. २९ (बातमीदार) ः मोखाड्यातील खोडाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काष्टी येथील निषा पंढरीनाथ बोटे ही १९ वर्षीय तरूणी बेपत्ता झाली आहे. निषा १३ सप्टेंबर रोजी घरातून निघून गेली आहे. ती घरी पुन्हा न परतल्याने तिच्या पालकांनी खोडाळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
खोडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निषा बोटे ही तरूणी शनिवारी मध्यरात्री एक वाजता घरातून बाहेर निघून गेली. तिचा शोध घेऊनही ती कुठेच न सापडल्याने निषाचे पालक पंढरीनाथ बोटे यांनी खोडाळा पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे.
स*स*स*स*स*स*स*स*स*स*स*स*स*स*
जांभे पैकी महसूल गाव पोचाडे येथे विशेष स्वच्छता अभियान
विक्रमगड (बातमीदार) ः तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत जांभे पैकी पोचाडे येथे विशेष स्वच्छता अभियान पार पडले. माझं गाव स्वच्छ तर माझा देश स्वच्छ या भूमिकेतून गावात सरकारी आस्थापने, रस्ते व गावातील आदिवासी संस्कृती जपणारे कुलदैवत मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. एक आदर्श गाव व्हावा व गावातील सर्व नागरिकांना स्वच्छतेची आवड लागावी म्हणून हा स्वच्छतेचा उपक्रम गटविकास अधिकारी विक्रमगड यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोचाडे शिक्षक भुसारा व विद्यार्थी वर्ग, पोचाडे गावातील बचत गटातील महिला व ग्रुप ग्रामपंचायत जांभे सरपंच निलम कैलास पारधी, उपसरपंच अजय मधुकर लहारे, ग्रामपंचायत सदस्य रोहिणी अजय लहारे, पोचाडे गावातील नागरिक सागर भोये, जगदीश चौधरी, सुभाष लहारे, हेमंत राऊत, ईश्वर चौधरी यांनी स्वच्छता कार्यक्रमात सहभाग दर्शवला.
---
दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती भाजपच्या वतीने उत्साहात साजरी
वाडा (बातमीदार) ः भाजपा कुडूस मंडळाच्या वतीने सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून भाजपच्या कार्यकर्त्यांनी साजरी केली. कंचाड मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तालुक्यातील कुडूस, चिंचघर, वाडा, मोहोट्याचापाडा, बिलावली, निंबवली खरीवली, खुपरी, नेहरोली, सोनाळे, केळठण, चांभले, डाकिवली, जाळे आदी गावांसह तालुक्यात दीनदयाळ उपाध्याय जयंतीचा कार्यक्रम पक्षाच्या वतीने साजरा करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाउपाध्यक्ष संदीप पवार, मंडळाध्यक्ष मोनिष पाटील, संतोष पाटील, स्वप्नील रोठे, दिलीप पाटील, धनश्री चौधरी,माजी सभापती अश्विनी शेळके, महीला आघाडी मंडल अध्यक्षा अंकिता दुबेले, सरचिटणीस दिक्षा पाटील, युवामोर्चा मंडल अध्यक्ष अक्षय पाटील, पंढरीनाथ घोडविंदे, दिपक मोरे, दिनेश पांडे, कांतिलाल गोरे, जगदीश कोकाटे, गणेश पाटील, हेमंत पष्टे, सुरेश पाटील, विनोद जाधव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
नैसर्गिक शेतीचे महिला शेतकऱ्यांना प्रशिक्षण
डहाणू (बातमीदार) ः जळवाई येथे कृषी सखी योजनेतील महिला शेतकऱ्यांना, कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान संस्था पातळीवरील प्रशिक्षण कार्यक्रम नुकतेच पार पडले. यावेळी कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भरत कुशारे, आत्माचे नामदेव वडिले, मंडळ कृषी अधिकारी जगदीश पाटील आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूर्वी शेतकरी रासायनिक खते व कीटकनाशके वापरत नसतानाही, केवळ शेणखताचा वापर करून उत्पादन घेत असल्याचे जगदीश पाटील यांनी सांगितले. तर नामदेव वाडीले यांनी योजनेची माहिती दिली. भरत कुशारे यांनी नैसर्गिक शेती अंतर्गत प्रत्यक्ष शेतात निर्विष्ठ वापरण्याचे आवाहन करून शेतकऱ्यांनी दशपर्णी, मृत घनजीवामृत, अग्निअस्त्र, ब्रह्मास्त्र आदी निर्विष्ठ तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. त्याचा वापर कधी आणि कसा करावा याबाबत माहिती दिली.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com