शाश्वत शहर घडविण्यात गृहसंकुलांची भूमिका महत्त्वाची

शाश्वत शहर घडविण्यात गृहसंकुलांची भूमिका महत्त्वाची

Published on

शाश्वत शहर घडविण्यात गृहसंकुलांची भूमिका महत्त्वाची
आयुक्त अभिनव गोयल यांचे प्रतिपादन; डोंबिवलीत ‘शाश्वत-सुरक्षित इमारत’ चर्चासत्र

डोंबिवली, ता. २७ ः स्मार्ट शहर म्हणजे फक्त तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा नव्हे, तर नागरिकही जबाबदार, जागरूक आणि स्मार्ट असले पाहिजेत. शाश्वतता आणि सुरक्षा या कोणत्याही शहराच्या विकासासाठी मूलभूत गरजा आहेत, असे प्रतिपादन कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी केले. कल्याण पश्चिमेतील मोहन अल्टीझा या गृहसंकुलात ‘शाश्वत-सुरक्षित इमारत’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत-यांत्रिकी) प्रशांत भागवत यांच्या पुढाकारातून प्रथमच अशा स्वरूपाचा उपक्रम राबवण्यात आला.

चर्चासत्रात कल्याण-डोंबिवलीतील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमात पाणी व्यवस्थापन, सौरऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी प्रक्रिया, वृक्षलागवड, विद्युत सुरक्षा, घनकचरा व्यवस्थापन आणि अग्निसुरक्षा अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. शाश्वततेत पुढाकार घेणाऱ्या सोसायट्यांना महापालिकेच्या वतीने मानांकन व प्रोत्साहन देण्याचा विचार सुरू आहे; मात्र नियम पाळले नाहीत, तर भविष्यात आर्थिक दंड आकारण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही आयुक्त गोयल यांनी दिला.

नागरिकांच्या छोट्या-छोट्या सवयी शहराच्या शाश्वततेत मोठा बदल घडवू शकतात. त्यामुळे प्रत्येक गृहसंकुलाने पुढाकार घेतला पाहिजे, असे ते पुढे म्हणाले. कार्यक्रमापूर्वी आयुक्त गोयल यांनी मोहन अल्टीझा सोसायटीतील सौरऊर्जा प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले. या वेळी उपआयुक्त संजय जाधव, प्रशांत पाटील (स्वच्छता ब्रँड अ‍ॅम्बेसेडर), नामदेव चौधरी (मुख्य अग्निशमन अधिकारी), तसेच सोसायटीचे अध्यक्ष संजय शहा, सचिव मुकेश उत्तमानी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com