स्वच्छतेमुळेच शहराची ओळख : हर्षल गायकवाड

स्वच्छतेमुळेच शहराची ओळख : हर्षल गायकवाड

Published on

स्वच्छतेमुळेच शहराची ओळख : हर्षल गायकवाड
सफाई कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम

कल्याण, ता. २७ (वार्ताहर) ः शहराच्या स्वच्छतेवरच त्या शहराची खरी ओळख ठरते. ही जबाबदारी पार पाडणारे सफाई कर्मचारी आणि सफाई मित्र हे शहराचे खरे हीरो आहेत, असे गौरवोद्गार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी व्यक्त केले. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या ‘स्वच्छता ही सेवा - स्वच्छोत्सव २०२५’ अभियानांतर्गत प्र. के. आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक सुरेश बनसोडे, मुख्य लेखा अधिकारी दिग्विजय चव्हाण, अतिरिक्त शहर अभियंता जगदीश कोरे, महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त प्रसाद बोरकर, उपायुक्त संजय जाधव, तसेच इतर अधिकारी, कर्मचारी, सुमारे ७००-७५० सफाई कर्मचारी, एनएसएस विद्यार्थी आणि एनजीओ प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सफाई कर्मचाऱ्यांसाठी गायन, नृत्य आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, पोस्ट ऑफिस बचत योजना यांची माहितीही कर्मचाऱ्यांना देण्यात आली.

विशेष म्हणजे, या वेळी २७३ कर्मचाऱ्यांची आभा कार्डासाठी आणि १३५ कर्मचाऱ्यांची प्रधानमंत्री आयुष्मान भारत कार्डासाठी नोंदणी करण्यात आली. कार्यक्रमात महापालिकेच्या ६० मुकादम व सफाई कर्मचारी, विविध अभियानात सहकार्य करणारे एनजीओ व एनएसएस विद्यार्थी यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वच्छता शपथ घेण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या नृत्य व गायन सादरीकरणांनी वातावरणात रंगत निर्माण केली. मुख्य स्वच्छता अधिकारी आगस्तीन घुटे यांनी कार्यक्रमाची सांगता करीत उपस्थितांचे आभार मानले. सफाई कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com