बेकायदेशीर बांधकामांना नोंदणी कार्यालयाचा आधार

बेकायदेशीर बांधकामांना नोंदणी कार्यालयाचा आधार

Published on

बेकायदा बांधकामांना नोंदणी कार्यालयाचा आधार
सह दुय्यम निबंधक निलंबित; ३० सप्टेंबरला मंत्रालय स्तरावर बैठक
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २७ : कोपरखैरणे येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात केवळ १० दिवसांत ८४२ बेकायदा इमारतींची नोंदणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तपासात उघडकीस आला आहे. याप्रकरणी महसूल विभागाने तातडीने सह दुय्यम निबंधक राजकुमार दहिफळे यांना निलंबित केले आहे. आणखी सखोल चौकशी करण्यासाठी आरटीआय कार्यकर्ते भास्कर झरेकर यांच्या मागणीनंतर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी ३० सप्टेंबर रोजी संबंधित सर्व सरकारी यंत्रणांची मंत्रालय स्तरावर बैठक बोलावली आहे.
न्यायालयाच्या निर्देशानुसार, महापालिका बेकायदा बांधकामांची यादी नोंदणी कार्यालयांना देत असते, जेणेकरून नागरिकांची फसवणूक होऊ नये. मात्र कोपरखैरणे कार्यालयात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामांची नोंदणी होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानंतर झालेल्या तपासणीत जून महिन्यात नियमित सरासरीपेक्षा जास्त (सुमारे १,५००) मालमत्तांची नोंदणी झाल्याचे आढळले. अधिक चौकशीत १० दिवसांमध्ये तब्बल ८४२ बेकायदा बांधकामांची दलालांमार्फत नोंदणी झाल्याचे समोर आले. महसूल विभागाचे अवर सचिव विनायक लवटे यांनी दहिफळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी भास्कर झरेकर यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना केली होती. बनसोडे यांनी मागणीची दखल घेत येत्या ३० सप्टेंबरला संबंधित प्राधिकरणाची मंत्रालयात बैठक बोलावली आहे.

सहदुय्यम निबंधक कार्यालयाकडून महापालिकेला उलट पत्र
बेकायदा मालमत्तांची मुद्रांक शुल्क भरून नोंदणी करून घेऊ नये, असे पत्र नवी मुंबई महापालिकेतर्फे कोपरखैरणे सह दुय्यम निबंधक कार्यालयाला दिले होते. परंतु आपण हे पत्र कोणत्या कायद्यान्वये देत आहात. त्याची प्रत उपलब्ध करावी, असे उलटअर्थी पत्र सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडून नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाला जून २०२५मध्ये देण्यात आले. तसेच या पत्रानंतरही राजरोसपणे बेकायदा इमारतींची नोंदणी सुरू असल्याचे अखेर उघडकीस आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com