अॅड. वसंतराव धारगळकर यांचे निधन

अॅड. वसंतराव धारगळकर यांचे निधन

Published on

ॲड. वसंतराव धारगळकर यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ ः डोंबिवली नागरी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष ॲड. गणेश धारगळकर यांचे वडील प्रसिद्ध वकील ॲड. वसंतराव धारगळकर यांचे निधन झाले आहे. शनिवारी (ता. २७) रात्री साडदहा वाजता त्यांचे निधन झाले. ज्येष्ठ वकील धारगळकर यांच्या निधनाने डोंबिवलीच्या जडणघडणीतला एक महत्त्वाचा दुवा निखळला असल्याची भावना भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. जनसंघ, भाजप, वनवासी कल्याण आश्रम, अधिवक्ता परिषद आदी संस्थांची विशेष बांधणी त्यांनी केलेली होती. ही बांधणी करणारा एक अस्सल संघटक हरपला असल्याचे म्हणत चव्हाण यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

Marathi News Esakal
www.esakal.com