विजचोरीला लगाम

विजचोरीला लगाम

Published on

वीजचोरीला लगाम
नवी मुंबईत वर्षभरात स्मार्ट मीटर बसणार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २८ ः विजेच्या अतिरिक्त वापरावर मर्यादा तसेच चोरीला लगाम लावण्यासाठी महावितरणतर्फे नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरात स्मार्ट वीज मीटर बसवण्यात येत आहेत. आतापर्यंत शहरात एक लाख ६० हजार मीटर बसवण्यात महावितरणला यश आले असून वर्षभरात वाशी मंडळातील जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत.
नवी मुंबई शहराचा विकास झपाट्याने होत आहे. ऐरोलीपासून अगदी बेलापूरपर्यंत शहरे विस्तारली आहेत. पनवेल, उरण हा भाग सिडकोव्याप्त नवी मुंबईचा भाग आहे. या भागात असणारी गावे आता नगरे होत आहेत. विमानतळामुळे गावांचे रूपांतर शहरांमध्ये होत आहे. सिडकोच्या माध्यमातून गृहनिर्माण प्रकल्प, रस्ते, पदपथ, गटारे, पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधांमुळे पालिकेच्या हद्दीतील लोकसंख्या २२ लाखांच्या पुढे गेली आहे. तर पनवेल महापालिकेची लोकसंख्या जवळपास २० लाखांपर्यंत आहे. वाढत्या गरजांमुळे विजेवरील चालणाऱ्या उपकरणांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जून्या पद्धतीचे वीज मीटरऐवजी स्मार्ट मीटरचा पर्याय महावितरणने आणला आहे. ग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार मीटर रिचार्ज करता येणार आहे. तसेच किती वापर केला हे संदेशातून कळवले जाणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांनी दिली.
-------------------------------------
नव्या प्रणालीचे फायदे
- महावितरणच्या वाशी मंडळात सुमारे ११ लाखांहून अधिक महावितरणचे ग्राहक आहेत. वाणिज्य, रहिवासी, औद्योगिक अशा ग्राहकांचा समावेश होतो. त्यापैकी एक लाख ६० हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवले आहेत. उर्वरित मीटर बसवण्याचे काम सुरू आहे.
- महावितरणतर्फे बसवण्यात येणारे स्मार्ट मीटर जरी प्रीपेड असले, तरी सध्या ग्राहकांना ही सुविधा सुरू केलेली नाही. सुरुवातीच्या काळात पोस्टपेड सुविधा महावितरणतर्फे देण्यात येणार आहे. त्यामुळे देयके नागरिकांच्या घरी येणार आहेत; मात्र वीज वापराचे रिडींग मेसेजद्वारे ग्राहकांच्या मोबाईलवर जाणार असल्याने ग्राहकांना वीज वापराची माहिती उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com