पनवेलची अमरधाम स्मशानभूमी झाली चकाचक

पनवेलची अमरधाम स्मशानभूमी झाली चकाचक

Published on

पनवेलची अमरधाम स्मशानभूमी चकाचक
पनवेल, ता. २८ (बातमीदार) ः येथील मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या मुख्य अमरधाम स्मशानभूमीची मोठी दुरवस्था झाली होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर आणि शिवसेना नेते चंद्रशेखर सोमण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी तातडीने लक्ष घालून स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे. यावर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून स्मशानभूमीतील पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था, अंतर्गत शववाहिन्यांची दुरवस्था, अपुरी प्रकाश व्यवस्था, बंद पडलेले इन्व्हर्टर आणि लहान मुलांची दफनभूमी अशा अनेक गंभीर समस्या नागरिकांकडून नोंदवल्या जात होत्या. या सर्व मुद्द्यांवर ११ ऑगस्ट रोजी शिवसेना नेते चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांना फोटो पुराव्यासहित निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
या शिष्टमंडळात उपमहानगर प्रमुख महेश सावंत, शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, शहर संघटक अभिजित साखरे, उपशहर संघटक सिद्धेश खानविलकर, कार्यकर्ते खंडेश धनावडे, सुजन मुसलोंडकर, माजी नगरसेवक अनिलकुमार कुलकर्णी यांचा समावेश होता. चर्चेदरम्यान स्मशानभूमीचे इतरत्र स्थलांतरणाला ठाम विरोध नोंदवण्यात आला आणि २४ तास सुरक्षा रक्षक नेमण्याची व सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती,
मात्र निवेदन देऊनही महिनाभर काही हालचाल न झाल्याने सोमण यांनी बुधवारी (ता. २५) प्रशासनास स्मरणपत्र देऊन तत्काळ कार्यवाहीचे आवाहन केले. त्यानंतर आयुक्तांनी विषय गांभीर्याने घेत तातडीने अमरधाम स्मशानभूमीच्या स्वच्छतेचे काम सुरू करण्याचे आदेश दिले. संबंधित विभागाकडून त्वरित स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे.

दोन वेळा स्वच्छता
यासोबतच महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रमुख स्मशानभूमीची महिन्यातून दोन वेळा स्वच्छता करण्यात येईल, असे आयुक्तांनी आश्वासन दिले आहे. पायाभूत सुविधांसाठी लवकरच आवश्यक सुधारणा करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.
पालिकेच्या या तातडीच्या कार्यवाहीबद्दल शिवसेना पनवेल शाखेने महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com