रियल इस्टेट एजंटला कायद्याचे ज्ञान

रियल इस्टेट एजंटला कायद्याचे ज्ञान

Published on

रियल इस्टेट एजंटला कायद्याचे ज्ञान
महरेराची मान्यता असलेल्या एसआयआयएलसीमार्फत प्रशिक्षण
मुंबई, ता. २८ : बांधकाम व्यवसाय तसेच जमीन खरेदी-विक्री संदर्भातील व्यवहारांचे कायदेशीर ज्ञान मध्यस्थी करणाऱ्या एजंट्सकडे असावे तसेच बांधकाम व्यावसायिक ग्राहक व एजंटमधील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा)च्या वतीने व्यवसाय करताना प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. (महारेरा आदेश क्र. ४१/२०२३) हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी निहीत कालमर्यादेतील ऑनलाइन किंवा ऑफलाइन प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे. ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’ या प्रशिक्षणासाठी महारेराकडून अधिकृत प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता मिळालेली संस्था आहे.
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा)च्या वतीने बांधकाम व्यावसायिकांना त्यांचे प्रकल्प महारेराकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर बांधकाम व रिअल इस्टेट व्यवसायात एजंट्सचे काम करणाऱ्यांना रजिस्ट्रेशन बंधनकारक आहे. महारेराने त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये आणखी नव्याने सुधारणा करताना एजंट्ससाठी प्रमाणपत्र प्रशिक्षण व त्याला जोडून होणारी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवल्यानंतरच नवीन एजंटना पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत एजंटमार्फतच मालमत्ता खरेदी करावी, असे आवाहन महारेराने ग्राहकांना केले आहे. तसेच ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी महारेराने कार्यपद्धतीमध्ये सुधारणा केल्या आहेत. तसेच आदेश क्र.४१A/२०२३ नुसार सक्षमता प्रमाणपत्र नसणाऱ्या एजंटवर कारवाई करू, असा इशाराही महरेराने दिला आहे.
--------------------------------
२० तासांचे प्रशिक्षण
महारेरा सक्षमता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठीचे प्रशिक्षण ऑनलाइन, ऑफलाइन स्वरूपात उपलब्ध आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यास परीक्षेसाठी अर्ज करता येतो. अर्ज करण्याचे पोर्टल १० नोव्हेंबर रोजी बंद होत असल्याने तत्पूर्वी प्रशिक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. २०२५ या वर्षात नंतर पोर्टल चालू होण्याची शक्यता नसल्याने प्रशिक्षण पूर्ण करून डिसेंबर २०२५ मध्ये होणाऱ्या परीक्षेस सामोरे जाण्याची ही या वर्षातील शेवटची संधी आहे. प्रशिक्षणाचे प्रतिव्यक्ती शुल्क पाच हजार रुपये अधिक जीएसटी आहे.
--------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क : ८४८४८२२८५५, ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२
संकेतस्थळ : https://mahareratraining.com/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com