महामुंबई पुन्हा ‘धारे’वर

महामुंबई पुन्हा ‘धारे’वर

Published on

महामुंबई पुन्हा ‘धारे’वर
ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत पिकांना फटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना रविवारी (ता. २८) मुसळधार पावसाने झोडपून काढले. मुंबई शहर आणि उपनगरांत धाे-धाे बरसणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील ग्रामीण भागांत मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस अतिवृष्‍टीचा अंदाज वर्तवल्यामुळे जिल्हा प्रशासनांनी सर्व यंत्रणांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

मुंबई परिसरात शनिवारी (ता. २७) मध्यरात्रीपासून पावसाने जाेर धरला होता. रविवारी अनेक कार्यालये बंद असल्यामुळे नोकरदारांना दिलासा मिळाला. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांना रविवारच्या वेळापत्रकाचा काही प्रमाणात फटका बसला. अनेकांनी पावसामुळे बाहेर पडणे टाळले. पावसामुळे वाहतूकही धीम्या गतीने सुरू होती. ठाणे जिल्ह्यात उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे शहरात झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या असून काही वाहनांचे नुकसान झाले आहे. मुरबाड तालुक्यात भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाहे. या जिल्ह्यातील तीन बंदरांवर तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून भातपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या जिल्ह्यातील खारगाव येथे वीज पडून पाच जण जखमी झाले आहेत. धामणी धरण शंभर टक्के भरल्यामुळे पाचही दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे सूर्या नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मध्य वैतरणातूनही विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याचा धाेका असल्याने पालघर जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com