डोंगरदरीतून जीवघेणा प्रवास
डोंगरदऱ्यांतून जीवघेणा प्रवास
खोंडा ग्रामस्थांचा उपजीविकेसाठी झगडा
माथेरान, ता. २९ (बातमीदार) ः उरण तालुक्यातील खोंडा गावाकडे माथेरानमधून जाणारी पायवाट भूस्खलनामुळे लुप्त झाली आहे. त्यामुळे उपजीविकेसाठी ग्रामस्थांना डोंगरदऱ्यांतून खाली उतरण्यासाठी लाकडी शिडीवरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
उरण तालुक्यात येणारे खोंडा गावातील आदिवासींची उपजीविका माथेरानवर अवलंबून आहे. खोंडा गावाकडे जाण्यासाठी माथेरानमधील शार्लेट लेकजवळील छत्रपती शिवाजी महाराज लॅडर नावाच्या दरीतून शिडी उतरून जावे लागते. काही वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे शिडीचे नुकसान झाले होते. त्या वेळी गुजरात भवन हॉटेलचे मालक उमेश दुबल यांनी केलेल्या आर्थिक मदतीतून लोखंडी शिडी उभारली होती; मात्र मुसळधार पावसात दुरवस्था झाल्याने पुन्हा लाकडी शिडीवरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
---------------------------------------------
घरी पोहोचण्याची श्वाश्वती नाही!
खोंडा गावाकडे जाणारी पायवाट भूस्खलनामुळे लुप्त झाली आहे. गावात जायला दुसरा मार्गच नाही. एकीकडे मोरबे धरण, दुसरीकडे प्रबळगड असल्याने माथेरानमध्येच मोलमजुरीतून पोटापाण्याची व्यवस्था होते. दिवसभर काम केल्यानंतर परतीचा प्रवास अतिशय धोकादायक असतो. त्यामुळे घरी पोहोचेपर्यंत जिवंत राहण्याची शाश्वती नसल्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
़़़़़़़ः------------------------------
भूस्खलनामुळे पायवाट वाहून गेली आहे. लोखंडी शिडी तुटल्यामुळे लाकडी शिडी केली आहे. त्यामुळे जीव मुठीत घेऊन रोज ये-जा करावी लागते. या प्रवासाची प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे.
- प्रदीप उघडा, ग्रामस्थ, खोंडा
----------------------------------------------
भारताला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे लोटली तरी आदिवासीवाड्यांतील ग्रामस्थ मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत. रस्ता, पाणी, वीज गावात पोहोचलेली नाही. त्यांना न्याय देण्यासाठी सनदशीर मार्गाने लढणार आहे.
- जनार्दन पार्टे, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.