आयुर्वेदातून सुदृढ आरोग्याचा मंत्र
आयुर्वेदातून सुदृढ आरोग्याचा मंत्र
डॉ. मधुरा कुलकर्णी यांचा रुग्णांना मदतीचा हात
वंशिका चाचे ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ ः आरोग्य, आयुर्वेद आणि समाजसेवेची त्रिसूत्री साधत ठाण्यातील डॉ. मधुरा कुलकर्णी यांनी नेहमीच रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. डॉ. मधुरा कुलकर्णी या एक अत्यंत कुशल आयुर्वेदिक स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. मधुरा यांना ३२ वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. डॉ. कुलकर्णी हे केवळ एक कुशल चिकित्सकच नव्हे, तर एक प्रतिष्ठित शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या आणि उत्साही मॅरेथॉन धावपटूदेखील आहेत. त्यांनी आयुर्वेदावर सात पुस्तके लिहिली असून, नियमित स्तंभलेखिका म्हणून आरोग्य जागरूकता आणि तंदुरुस्तीचा प्रचार करतात.
कोविड काळात ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत रुग्णसेवेत योगदान देणाऱ्या डॉ. कुलकर्णी यांनी विशेषतः झोपडपट्ट्यांतील गरजू लोकांसाठी मोलाची मदत केली. त्या ‘आयुर्वेद प्रबोधिनी’ संस्थेद्वारे ‘श्वानवन’ (श्वानांचे रेस्क्यू प्रकल्प) क्लिनिकल सेमिनार्स आणि ‘आयुर्वेद मित्र पुरस्कार’ यांसारख्या उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांचा या कार्यासाठी ‘वैद्य खडीवाले सर्वोत्कृष्ट महिला डॉक्टर पुरस्कार’, ‘दुर्गा पुरस्कार’ आणि इतर अनेक सन्मानांनी गौरव केला गेला आहे.
आरोग्यसेवेसह सामाजिक ओढ असलेल्या डॉ. मधुरा कुलकर्णी यांनी आपल्या कार्यकाळात अनेक सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले आहेत. कोविड काळात त्यांनी ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत रुग्णांची सेवा केली. शहरातील झोपडपट्ट्यांमधील गरजू नागरिकांसाठी त्यांनी मोलाचे आणि विशेष कार्य केले. त्याचप्रमाणे त्या ‘आयुर्वेद प्रबोधिनी’ या संस्थेमार्फत श्वानवन (कुत्र्यांचे रेस्क्यू प्रकल्प), क्लिनिकल सेमिनार, आयुर्वेद मित्र पुरस्कार यांमध्येही सक्रिय आहेत. डॉ. कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून रुग्णांना आरोग्यसेवा पुरवली त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना वैद्य खडीवाले सर्वोत्कृष्ट महिला डॉक्टर पुरस्कार, दुर्गा पुरस्कार यासह अन्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. मधुरा कुलकर्णी यांच्याकडे आयुर्वेदात एमडी ही पदवी आहे. तसेच योग आणि तत्त्वज्ञान पदवी, तसेच बीएएमएसमध्ये मुंबई विद्यापीठात टॉपर आणि सुवर्णपदक विजेत्या आहेत. डॉ. कुलकर्णी यांनी आयुर्वेद, संधिवात, हृदयविकार यावर सात पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी विविध माध्यमांतून लेखन करून लोकांमध्ये आरोग्य जागरूकता वाढवली आहे. तसेच, डॉ. कुलकर्णी एक उत्कृष्ट धावपटू आहेत. त्यांनी अल्ट्रा मॅरेथॉन आणि अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून बंगलोर अल्ट्रा रन (७५ किमी), सप्तशृंगी हिल रन (२१ किमी) आणि टाटा मुंबई मॅरेथॉन (४२ किमी) तीन वेळा पूर्ण केली आहे.
निरोगी आरोग्यासाठी कार्यशाळांचे आयोजन
डॉ. मधुरा महिलांना वैद्यकीय समुपदेशन देत निरोगी जीवनशैलीचे मार्गदर्शन करतात. निरोगी आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यशाळा, चर्चासत्रे आणि सार्वजनिक भाषणे आयोजित करतात. ‘आरोग्यभारती’च्या सुप्रजा राष्ट्रीय प्रमुख म्हणून गर्भसंस्काराला प्रोत्साहन देण्याचा त्यांनी सामाजिक कार्यात विशेष वाटा उचलला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘आयुर्वेद प्रबोधिनी’ संस्थेच्या माध्यमातून विविध आरोग्यविषयक आणि सामाजिक उपक्रम साकारले जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.