नवी मुंबईतील प्रमुख महामार्ग चकाचक

नवी मुंबईतील प्रमुख महामार्ग चकाचक

Published on

नवी मुंबईतील प्रमुख महामार्ग चकाचक
स्वच्छता अभियानमध्ये ५ हजारहून अधिक श्रीसदस्य सहभागी
वाशी, ता. ३० (बातमीदार) : केंद्र सरकारच्या “स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता ही सेवा, अभियानाच्या अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने रविवारी सायन- पनवेल महामार्ग व ठाणे-बेलापूर मार्गावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरही सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेल्या या मोहिमेत तब्बल सात हजाराहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते.
मोहिमेचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध स्वरूपात करण्यात आले होते. विशेष म्हणजे, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, अलिबाग यांचे पाच हजारहून अधिक श्रीसदस्य या मोहिमेत सहभागी झाले. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. अजय गडदे, बेलापूर विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अमोल पालवे आणि इतर महापालिका अधिकारी व पदाधिकारी यांनी उपस्थित राहून मोहिमेला उर्जा दिली. कार्यक्रमाची सुरुवात सहभागी उपस्थितांनी सामूहिक शपथ घेऊन केली. यानंतर वाशी, तुर्भे, सानपाडा, जुईनगर, नेरूळ व बेलापूर विभागांतील ठराविक अंतरांचे क्षेत्र विविध गटांना स्वच्छतेसाठी वाटप करण्यात आले. प्रत्येक गटाने आपल्या वाटप केलेल्या क्षेत्रात साफसफाई, गवत व रानटी झाडे काढणे, गटर व पाण्याच्या नळांचे मार्ग मोकळे करणे यासह कचऱ्याचे संकलन केले. या मोहिमेत प्लॅस्टिक बॉटल्स, तुटलेल्या काचाच्या तुकड्या, प्लॅस्टिक पिशव्या, चॉकलेट व खाद्यपदार्थांचे रॅपर, कापड व कागद यासह विविध प्रकारचा कचरा संकलित केला गेला. पावसाची पर्वा न करता छत्र्या व रेनकोट परिधान करून सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे नवी मुंबईत स्वच्छतेची मोठी चळवळ उभी राहिली. महामार्गावरून जाणारे प्रवासीही या मोहिमेकडे उत्सुकतेने पाहत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com