दिवाळीपूर्वी मूल्यमापन चाचणी
दिवाळीपूर्वी मूल्यमापन चाचणी
मुंबई विभागात एक हजार ३५८ शाळांमध्ये होणार परीक्षा
मुंबई, ता. २९ ः
शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या लागण्यापूर्वी राज्यातील सरकारी, अनुदानित दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा (पॅट-१) राज्यभरात आयोजित करण्यात येणार आहे. ही परीक्षा मुंबई शिक्षण उपसंचालक विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ७३३ शाळांमध्ये आणि महापालिकेअंतर्गत येणाऱ्या एक हजार ३५८ शाळा अशा दोन हजार ९१ शाळांमध्येही होणार आहे. एकूण चार लाख २० हजार ९५१ विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत.
मुंबई विभागात ही परीक्षा सुरळीत व्हावी, यासाठी शाळा व्यवस्थापन, शिक्षक सज्ज झाले आहेत. शालेय शिक्षण विभाग आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयातून वेळोवेळी शाळांना सूचना दिल्या जात आहेत. तसेच विविध वर्गातील विषय आणि त्या परीक्षेचे नियोजन यासंदर्भातील मार्गदर्शनही केले जात आहे.
राज्यातील सर्व शाळांमध्ये पॅट परीक्षा आणि या परीक्षेच्या नियोजनासाठी शालेय शिक्षण विभागाने तब्बल ३० कोटी १६ लाख सहा हजार ३०० रुपयांची तरतूद केली असून, त्यासाठीचा आदेश जारी केला आहे.
पॅट परीक्षेचा हा एकूण निधी समग्र शिक्षा योजनेच्या राज्य हिश्श्यातून उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली. राज्यात होणाऱ्या पॅट-१ परीक्षेला तब्बल ८४ लाख ७८ हजार ८७० लाख विद्यार्थी बसणार असून, यासाठीचे वेळापत्रक नुकतेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी)ने जाहीर केले आहे. राज्यातील पॅट-१ अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची चाचणी होणार असल्याची माहिती एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावर यांनी दिली.
मूल्यमापन चाचणी-२ पुढील वर्षी
यंदाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात राज्यातील अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदेच्या विविध माध्यमांच्या शाळांतील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीला पायाभूत चाचणीनंतर संकलित मूल्यमापन चाचणी-१ या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. संकलित मूल्यमापन चाचणी-२ ही पुढील वर्षी एप्रिल महिन्यात घेण्याचे नियोजन आहे.
प्रश्नपत्रिका नियोजित वेळेत पाहोचणार
संकलित मूल्यमापन चाचणी-१ परीक्षेसाठी ग्रेड-२, ग्रेड-३, ग्रेड-४, ग्रेड-५, ग्रेड-६, ग्रेड-७ आणि ग्रेड-८ प्रमाणे सरकारी, अनुदानित शाळांतील विद्यार्थी असतील. यासाठी मागील परीक्षांचा अनुभव लक्षात घेता प्रत्येक शाळांमध्ये परीक्षेच्या प्रश्नपत्रिका नियोजित पद्धतीने पाठविल्या जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
असे आहेत विद्यार्थी
मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक
शाळा विद्यार्थी
७३३ १,९२,४५९
महापाालिका शाळा
१,३५८ २, २८, ५३२
--
राज्यभरातील विषयनिहाय पॅट-१ चाचणीचे विद्यार्थी
भाषा विद्यार्थ्यांची एकूण संख्या
मराठी ७०,९१,९७८
उर्दू ७७,५,८७८
इंग्रजी ३४,८,५९४
गुजराती ११,९६०
हिंदी २२,२,३५९
कन्नडा २०,६०४
सिंधी ४८४
तामिळ २,५०१
तेलुगू १,१९५
बंगाली ३,३१७
--
ग्रेड नुसार विद्यार्थ्यांची संख्या
ग्रेड सरकारी अनुदानित
ग्रेड-२ ६,९४,१८८ ३,३०,३८३
ग्रेड-३ ७,४३,८५५ ३,५६,७८१
ग्रेड-४ ८,०३,५११ ३,९१,७९५
ग्रेड-५ ५,६०,३६३ ८,०२,७५१
ग्रेड-६ ४,१४,७३१ ८,१६,०७७
ग्रेड-७ ३,९३,१२९ ८,५३,३५२
ग्रेड-८ २,०५,०४४ ११,१३,९१०
एकूण : ८४ लाख ७८ हजार ८७०
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.