सहाय्यक आयुक्त मनोज वनमाळी निलंबित

सहाय्यक आयुक्त मनोज वनमाळी निलंबित

Published on

सहाय्यक आयुक्त मनोज वनमाळी निलंबित
अनधिकृत बांधकामावरील कारवाई टाळल्याप्रकरणी कारवाई

विरार, ता. २९ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका प्रभाग समिती अ-बोळिंजचे प्रभारी सहाय्यक आयुक्त मनोज वनमाळी यांना अनधिकृत बांधकामप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २६०(१)अन्वये अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी त्यांची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती; परंतु अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याबाबतचे निर्देश असतानाही त्यांनी प्रभाग समिती अ-बोळिंज कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात टाळटाळ केली. त्यामुळे त्यांना ९ सप्टेंबर २०२५ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली होती. तसेच उपायुक्त (परिमंडळ-१) यांनीही त्यांच्याविरोधात अभिप्राय दिलेला होता. त्यानंतरही आदेशांची अंमलबजावणी प्रलंबित होती. अखेर कामात हलगर्जी व कामचुकारपणाचा ठपका ठेवत आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी शनिवारी (ता.२७) त्यांचे निलंबन केले.


मनोज वनमाळी यांनी याआधी प्रभाग समिती एच-वसई-माणिकपूरमध्ये कार्यरत असताना वसई गाव मौजे चुळणे येथील सर्व्हे क्रमांक : १२३ हिस्सा क्रमांक : १ ते ६ या खासगी जागेतील अनधिकृत बांधकामाला एमआरटीपी कायद्यांतर्गत केवळ नोटीस बजावून निष्कासन करवाई करण्यास जाणूनबुजून दुर्लक्ष केलेले होते. अविनाश डॉमनिक घोसाळ यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत महाराष्ट्र राज्य व वसई-विरार महापालिका यांना प्रतिवादी केले होते. २० जुलै २०२५ रोजीच्या या याचिकेवरील सुनावणीत न्यायमूर्ती ए. एस. गडकरी व कमल खाता यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, असे निर्देश पालिका आयुक्तांना दिले होते. याप्रकरणी उपायुक्त अजित मुठे यांनाही न्यायालयाने दोषी ठरवले होते. दरम्यानच्या काळात मनोज वनमाळी यांची बदली प्रभाग समिती अ-बोळिंज प्रभागात झालेली होती, परंतु त्यांनी या ठिकाणीही अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करण्यात हात आखडता घेतलेला होता. त्यांच्या या कृतीमुळे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी त्यांचे निलंबन केले आहे.

अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्यांविरोधात पालिका प्रशासन कठोर कारवाई करत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामे कशी होणार नाहीत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त, वसई-विरार महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com