दिव्यांग महिलेकडून १९ लाख उकळले
दिव्यांग महिलेकडून १९ लाख उकळले
वकिलाने फसवणूक केल्याची महाराष्ट्र बार कौन्सिलकडे तक्रार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : रस्ते अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या महिलेकडून कायदेशीर शुल्क म्हणून जवळपास १९ लाख रुपये उकळल्याचा आरोप पीडित महिलेने वकिलावर केला आहे. याविरोधात महिलेने मुंबई उच्च न्यायालयाच्या महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलकडे तक्रार केली आहे. त्यावर मंगळवारी (ता. ३०) सुनावणी हाेण्याची शक्यता आहे.
जवळपास ११ वर्षांपूर्वी झालेल्या या रस्ते अपघाताविरोधात महिलेने मोटार अपघात दावे न्यायाधिकरण (मॅट) मध्ये अपील केले होते. २३ ऑगस्ट २०२३ रोजी पीडितेला कायमस्वरूपी आलेले अपंगत्वाची गंभीर दखल घेऊन न्यायाधिकरणाने त्या महिलेला एकूण ९१ लाख ६८ हजार १५४ रुपये भरपाई मंजूर केली होती. नुकसान भरपाई प्राप्त झाल्यानंतर सप्टेंबर २०२४ मध्ये महिलेच्या वकिलाने कायदेशीर शुल्काची मागणी करून वेगवेगळ्या पाच धनादेशांद्वारे एकूण १९ लाख ४५ हजार ९५४ रुपये मागितल्याचा आरोप महिलेने केला आहे. हे शुल्क अपघाताच्या दाव्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या एकूण भरपाईच्या जवळजवळ २१.२३ टक्के असल्याचा दावाही तिने केला आहे. शिवाय वकिलाची पत्नी आणि मुलगा यांना ही वकील दाखवले असून मुळात ते दोघेही वकील नसल्याचे समोर आल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. आपल्या अपंगत्वाचा गैरवापर करून वकिलांनी पैसे उकळल्याचा दावाही तक्रारीत केला आहे.
-----
काय प्रकरण?
तक्रारकर्ती महिला पुण्यात सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होती. २८ जून २०१४ रोजी ती एका नातेवाbकाला भेटण्यासाठी नवी मुंबईला आली असताना एका ट्रेलर-वाहनाने तिला धडक दिली आणि ती रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. या भयानक धडकेमुळे तिला गंभीर दुखापत झाली ज्यामुळे तिचे दोन्ही पाय गुडघ्याखाली कापावे लागले. अपघातामुळे तिला वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी कायमचे अपंगत्व आले. नोकरी आणि उत्पन्नाचा स्रोतही गमवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.