अभिनय क्षेत्रातील वाटचाल प्रेक्षकांमुळे
अभिनय क्षेत्रातील वाटचाल प्रेक्षकांमुळे
उलवेत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नागरी सत्कार
उरण, ता. ३० (वार्ताहर)ः रसिक प्रेक्षक माझे मायबाप आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम प्रामाणिकपणे केले, मला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून प्रेम दिले. अभिनय क्षेत्रातील वाटचाल केवळ त्यांच्यामुळेच असल्याचे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ म्हणाले. उलव्यातील यमुना सामाजिक संस्थेतर्फे झालेल्या नागरी सत्कार कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
उलवेतील भूमिपुत्र भवनात अशोक सराफ यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. अशोक मामांना रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात सलामी दिली. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती. या वेळी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी अशोक सराफ यांच्यासारखा कलाकार पुन्हा होणे नाही. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळायला हवा. आम्हालाही राजकारणात रोज नवनवीन भूमिका कराव्या लागतात. अशा सर्व कलाकार मंडळींना एकत्र आणण्याचे काम महेंद्र घरत यांनी केले, तर माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी आजही अशोक सराफ यांचे चित्रपट आणि सिरीयल बघतो. या वयातही त्यांचे काम उल्लेखनीय आहे. आमच्या हस्ते त्यांचा सत्कार होणे, हे भाग्य समजतो. अशोक सराफ यांचे चित्रपटसृष्टीसाठी योगदान खूप मोठे आहे. रसिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत असल्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले. तर महेंद्र घरत यांनी मनामध्ये ठरवले तर ते काहीही करू शकतात. एकाच व्यासपीठावर अनेक पक्षातील नेत्यांना एकत्र आणण्याचे काम तेच करू शकतात, असे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. या वेळी शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, साई मंदिर वहाळचे संस्थापक रवी पाटील, शिवसेनेचे बबन पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, मिलिंद पाडगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, विनोद म्हात्रे, गोपाल पाटील, राम म्हात्रे उपस्थित होते. शेलघर येथील यमुना सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र घरत आणि सचिव शुभांगी घरत यांच्या वतीने हा सोहळा करण्यात आला.
--------------------------------------
कलेवर मी प्रेम करतो. नाटक, चित्रपट, क्रिकेटची मलाही आवड आहे. कला जिवंत राहावी, तिला चांगले व्यासपीठ मिळावे, म्हणून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याला उलवे नगरीत आणले. त्यांना मानाचा मुजरा करतो.
- महेंद्र घरत, कामगार नेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.