संवादमुळे हजारो महिलांचा आत्मविश्वास

संवादमुळे हजारो महिलांचा आत्मविश्वास

Published on

संवादमुळे हजारो महिलांचा आत्मविश्वास उंचावला
पाच हजार जणींना आशेचा किरण
शीतल मोरे : सकाळ वृत्तसेवा
अंबरनाथ, ता. २९ : माझं दुःख पर्वताएवढं, असे प्रत्येकालाच वाटते. मलाही वाटत होते; मात्र जेव्हा प्रत्यक्ष समाजात उतरले, तेव्हा समजले खरे दुःख तर इतरांकडे आहे, त्यामुळे अशा जाणिवेतून २०१० मध्ये ‘संवाद फाउंडेशन’ची स्थापना केली. ही गोष्ट समाजसेवेची प्रेरणा घेणाऱ्या सुवर्णा सुभाष साळुंखे यांची आहे. एक सामान्य गृहिणी ते हजारो महिलांसाठी आशेचा किरण ठरलेल्या सुवर्णा यांनी आजवर पाच हजारपेक्षा अधिक महिलांना सक्षम करण्याचे कार्य केले आहे.

रायगड जिल्ह्यातील रामदास पठार गावात जन्मलेल्या सुवर्णा यांचे शिक्षण मुंबईत बी. काॅमपर्यंत झाले आहे. ५ मे १९९६ रोजी सुभाष साळुंखे यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांचे आयुष्य ‘चूल-मूल’ या चौकटीत सुरू झाले; मात्र काळानुरूप त्यांनी समाजातील गरजू, आधारहीन, शोषित महिलांसाठी झटायचे ठरवले त्यांनी महिलांना शासकीय योजनांची माहिती देणे, संवाद साधून त्यांना बोलकं करणे, काटकसर व बचतीचे धडे देणे अशा लहान प्रयत्नांपासून सुरुवात केली. आज त्यांच्या संवाद फाउंडेशनतर्फे महिलांच्या सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जातात. आजही सुवर्णा साळुंखे ‘तुमच्यासाठी काय करता येईल?’ हा प्रश्न घेऊन घराघरात जातात. ‘संवाद’ हे केवळ एक संस्थेचे नाव नसून, महिलांना दिलेला आवाज, आत्मभान आणि सक्षमतेची दिशा आहे. त्यांच्या कार्यामुळे हजारो महिलांनी ‘निर्णय घेणाऱ्या’ स्त्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

महिला सबलीकरण उपक्रम
उपजीविकेचे प्रशिक्षण
रांगोळी, बेकिंग, पर्स मेकिंग, ब्यूटी पार्लर, स्वयंपाकघरातील कचऱ्यापासून खतनिर्मिती

कला व सन्मान व्यासपीठ
‘श्रावण उत्सव’ व ‘महिला संवाद मेळावा’द्वारे महिलांचा सन्मान

शासकीय योजना थेट महिलांपर्यंत
जनधन योजना, आयुष्मान भारत, लाडकी बहीण योजना, निराधार पेन्शन योजना आदी

संवाद फाउंडेशनची ठळक कामगिरी
२५००+ महिलांना ‘लाडकी बहीण योजना’चा लाभ
१५०० घरेलू कामगार महिलांची शासकीय नोंदणी
५५ वर्षांवरील महिलांना ₹१०,०००/- चा एकरकमी लाभ

कामगार व विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
बांधकाम/नाका कामगारांसाठी नोंदणी व भांड्यांचे वाटप
१०वी-१२वी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिरे
रोजगार मेळावे व स्वयंरोजगार प्रशिक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com