थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

घेरासूरगड-वैजनाथ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
रोहा (बातमीदार) ः रोहा तालुक्यातील घेरासूरगड-वैजनाथ येथे मोफत ह्दय तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. बी. सी. जिंदल चॅरिटेबल ट्रस्ट रूग्णालय सुकेळी यांच्या वतीने सदरील शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कंपनी उत्पादनाबोबरच सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून व समिजहिताचे व्यापक दृष्टिकोन ठेवून कार्यरत असणाऱ्या रोहा तालुक्यातील व नागोठणे विभागातील सुकेळी येथील बी. सी. जिंदल कंपनीच्या वतीने राबविण्यात आलेल्या या शिबिरामध्ये हृदयरोगतज्ज्ञांकडून रूग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यास आले. यावेळी जिंदल रुग्णालयाचे व्यवस्थापक सर्वेश पांचोली, डॉ. प्रिया भोईर जिंदल रुग्णालयातील कर्मचारी दिनेश ठमके, किरण सुटे, शरन्या श्रीजीत, मोहिनी जांभेकर, अदिती जंगम, प्रफुल्ल चौधरी, मनिष डांगी, संदीप चालके, यशवंत वारगुडे आदी उपस्थित होते. घेराजनाथ येथील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
................
समाजसेवक प्रदीप देशमुख यांच्याकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात
पेण (बातमीदार) : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गावोगावी मोठे नुकसान झाले असून अनेक कुटुंबे विस्थापित झाली आहेत. या संकटाच्या काळात समाजसेवक प्रदीप देशमुख यांनी पुढाकार घेत पीडितांना मदतीचा हात दिला. त्यांनी पूरग्रस्त भागांना भेट देऊन धान्य, कपडे, औषधे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. देशमुख यांनी स्थानिक युवकांच्या मदतीने बचाव कार्यातही हातभार लावला. गावकऱ्यांनी त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. समाजकार्यातून सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
............
खारपाडा येथे स्वयंभू शिवाईमाता मंदिराच्या वतीने महाआरोग्य शिबिर
रोहा बातमीदार : खारपाडा येथील स्वयंभू शिवाईमाता मंदिर समितीच्या वतीने मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. नेत्रतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आदी अनुभवी डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून औषधे दिली. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. शिबिरात रक्तदाब, मधुमेह, डोळे, स्त्रीरोग यांची मोफत तपासणी करण्यात आली. मंदिर समितीने नियमितपणे असे उपक्रम आयोजित करण्याचा संकल्प केला आहे.
............
इब्सार लॉ विद्यालयात ॲड. गणेश शिरसाट यांचे मार्गदर्शन
पेण बातमीदार : इब्सार लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ॲड. गणेश शिरसाट यांनी विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले. न्यायालयीन कार्यपद्धती, भारतीय संविधानाचे तत्त्वज्ञान तसेच वकिली व्यवसायातील संधी यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थी जीवनात प्रामाणिकपणा व न्यायनिष्ठा हे गुण अंगीकारल्यास भविष्यात यश निश्चित मिळते, असे मत त्यांनी यावेळी मांडले. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांद्वारे शंका निरसन केले. कार्यक्रमाला प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते.
...........
पेझारी येथे सेवा पंधरवड्यातील आरोग्य शिबिराहस रक्तदान
पोयनाड : सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने पेझारी गावात आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांनी मोफत तपासणी करून औषधे दिली. रक्तदान शिबिरात युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. आरोग्यदायी समाज घडवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. गावकऱ्यांनी आयोजकांचे आभार मानले.
..............
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत इशा पाटीलचे सुयश
अलिबाग वातार्हर : महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शालेय तालुकास्तरीय स्पर्धा क्रीडा संकुल नेहुली येथे पार पडल्या. यामध्ये शहाबाज कोएसो माध्यमिक विद्यामंदिर शाळेची विद्यार्थिनी इशा पाटील हिने १०० मीटर, दोनशे मीटर धावणे आणि लांब उडी या तिन्ही क्रीडा प्रकारांमध्ये अव्वल स्थान पटकावून तीन सुवर्ण पदकांची मानकरी ठरली. त्याचप्रमाणे जियो इन्स्टिट्यूट उलवे उरण येथे झालेल्या १४ वर्षीय अजिंक्यपद मैदानी स्पर्धेमध्ये ६० मीटर धावणे, लांब उडी आणि बॅक थ्रो आदी स्पर्धा प्रकारांमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली आहे. तिचे यतीराज पाटील शाळा समिती, शहाबाजचे चेअरमन अशोककुमार भगत, जगदीश पाटील, सायली पाटील, गीता पाटील, सदू दुटे, जीवन पाटील भाकरवड तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व क्रीडाप्रेमी ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
...............
महात्मा गांधी वाचनालयात संत मुक्ताई जयंती
पेण (बातमीदार) : महात्मा गांधी वाचनालयात संत मुक्ताई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संत साहित्यावर आधारित व्याख्यान, भजन, कीर्तन यांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संत मुक्ताईंच्या अभंगांचे सादरीकरण केले. वाचनालयाच्या वतीने ‘संत मुक्ताई आणि समाजप्रबोधन’ या विषयावर चर्चासत्र झाले. उपस्थित मान्यवरांनी संतांचा विचार आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com