मुंबई
आगीत घरगुती साहित्य जळून खाक
कळव्यात गॅसगळतीमुळे घराला आग
कळवा, ता. ३० (बातमीदार) ः कळव्यातील भास्करनगर परिसरात एचपी गॅसचा नोझल लिकेज झाल्याने आग लागल्याची घटना मंगळवारी (ता. ३०) घडली आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरातील साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे.
कळव्यातील भास्करनगर येथील स्थानिक सूरज यादव यांच्या घरात सकाळी स्वयंपाकाच्या एचपी गॅसच्या नोझल लिकेज झाला. या वेळी लागलेल्या आगीत घरातील प्लॅस्टिक भांडी, वीज वायर, कपडे जळून नुकसान झाले आहे. या आगीची माहिती मिळताच कळवा पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.