वाशीत एनएमबीएच्या दुर्गोत्सवाला प्रतिसाद

वाशीत एनएमबीएच्या दुर्गोत्सवाला प्रतिसाद

Published on

वाशीत एनएमबीएच्या दुर्गोत्सवाला प्रतिसाद
संस्कृती, कलात्मकतेचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
नवी मुंबई, ता. ३० (वार्ताहर) : नवी मुंबई बंगाली असोसिएशनचा (एनएमबीए) ४६ वा वर्धापनदिन आणि दुर्गापूजा उत्सव यंदा २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान भव्य व दिमाखात साजरा होत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील सर्वांत मोठा मानला जाणारा हा दुर्गोत्सव वाशी रेल्वेस्थानकाजवळील पूर्णपणे वातानुकूलित सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला असून, तब्बल दीड लाख चौरस फूट परिसर सजविण्यात आला आहे. आठ लाखांहून अधिक भाविक या सोहळ्याला उपस्थित राहतील, असा आयोजकांचा अंदाज आहे.
या वर्षीचे प्रमुख आकर्षण म्हणजे पवित्र गंगा नदीच्या काठावरील पर्यावरणपूरक मातीपासून पश्चिम बंगालमधील कारागिरांनी घडविलेली १८ फूट उंचीची भव्य देवी दुर्गेची मूर्ती. भक्तांसाठी हे दर्शन अविस्मरणीय ठरणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांनाही यंदा विशेष भर देण्यात आला आहे. बॉलीवूड गायक सुदेश भोसले यांच्या खास मैफलीसह कोलकात्यातील नामवंत कलाकारांची रंगारंग सादरीकरणे प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. १९८१ रोजी स्थापन झालेली नवी मुंबई बंगाली असोसिएशन ही संस्था महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमांतर्गत नोंदणीकृत असून, समाजसेवा, संस्कृती व जनकल्याण क्षेत्रात मागील चार दशकांपासून कार्यरत आहे. अनाथ, गरजू व निराधार व्यक्तींसाठी चालविलेल्या विविध उपक्रमांबरोबरच समाजात बंधुता, विश्वास आणि प्रगतीचे वातावरण निर्माण करण्यावर एनएमबीएचा नेहमीच भर राहिला आहे. दुर्गापूजा उत्सवाच्या निमित्ताने समाजभावना, कलात्मकता आणि सांस्कृतिक वारसा एकत्र आणणारा हा सोहळा यंदाही नवी मुंबईकरांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com