अतिवृष्टीने पिकांची नासाडी

अतिवृष्टीने पिकांची नासाडी

Published on

अतिवृष्टीने पिकांची नासाडी
जिल्ह्यात दोन हजार हेक्टरला फटका, पाच हजार ८७८ शेतकरी बाधित
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३० : रायगड जिल्ह्यामध्ये पावसाच्या सततच्या माऱ्यामुळे पाच हजार ८७८ शेतकऱ्यांचे दोन हजार १८५ हेक्टर क्षेत्रातील भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक धोक्यात आले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात सुमारे ६६ हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. त्यानंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जवळपास दोन हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले आहे. सर्व पंचनामे पूर्ण झाले असून, नुकसानीसाठी एक कोटी ७५ लाखांच्या अनुदानाची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान पेण, कर्जत तालुक्यातील भातशेतीचे झाले आहे. पावसाचे सातत्य कायम असल्याने पिकांचे आणखी नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
-----
नव्या पीक विमा योजनेचा फटका
- जिल्ह्यात १६ हजार ५४ शेतकऱ्यांनीच पीक विमा उतरवला आहे. ही संख्या एकूण शेतकऱ्यांपेक्षा खूपच कमी आहे. सध्या कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी आठ हजार ५००, तर बागायती पिकांसाठी १७ हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. बहुवार्षिक पिकांसाठी २२ हजार ५०० रुपये एवढी मदत दिली जाणार आहे.
- जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेतच ही मदत मिळणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद आहे. नुकसानीच्या पंचनाम्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना जीपीएस लोकेशन असलेला फोटो बंधनकारक आहे. दरम्यान, शेतात गुडघ्याइतके पाणी असल्याने एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत मिळवणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे.
-----
आठवडाभरातील नुकसान
तालुका हेक्टर
अलिबाग २३८.००
पेण ७५६.५
मुरूड १.४६
खालापूर २१.७१
कर्जत ७३१.६६
पनवेल ८.४०
उरण २४४.८
माणगाव ३५.००
तळा ५२.१०
रोहा ५१.४०
सुधागड-पाली १.१५
महाड ०.२०
पोलादपूर १०.९५
म्हसळा ३२.३४
श्रीवर्धन ०.२५
एकूण २१८५.९२
----
नुकसानीवरील दृष्टिक्षेप
बाधित गावे - ६०६
बाधित शेतकरी - ५,८७८
३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्र - २१८५.९२
अपेक्षित अनुदान - १८५.८० (लाख रु.)
प्रत्यक्ष दिलेले अनुदान - ०.००
-----
जूनपासून आतापर्यंत जेमतेम ६६ हेक्टर क्षेत्र बाधित झालेले होते, मात्र सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा आकडा दोन हजार १८५ हेक्टरवर गेला आहे. आठवडाभरातील नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त झालेल्या नुकसानीचे आहे.
- वंदना शिंदे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com