वरळ गावामध्ये नवरात्री उत्सवात युवकांकडून भंडाऱ्याचे आयोजन
भंडाऱ्यातून भक्तांना प्रसादाचा लाभ
तळा. ता. ३० () ः ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळाचा उत्साही सहभागावात श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचे दर्शन घडवत वरळ ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आई वाघेश्वरी ग्रामदैवताचा नवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या पावन उत्सवात गावातील युवकांनी पुढाकार घेऊन रविवार (ता.२८) रोज भंडाऱ्याचे आयोजन करून भाविकांची सेवा केली. नवरात्री निमित्ताने देवीच्या मंदिरात सकाळ-संध्याकाळ आरत्या, भक्तिगीते आणि सुंदर सजावट यामुळे गावात मंगलमय वातावरण निर्माण झाले. दर्शनासाठी गावकरी तसेच परिसरातील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. दर्शनानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.गावात एकोप्याने आणि भक्तिभावाने उत्सव साजरा होणे हीच खरी परंपरा आहे, असे समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केले. युवकांच्या पुढाकारामुळे सेवा, श्रद्धा आणि ऐक्याची भावना वृद्धिंगत झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. महिला मंडळाच्या उत्साही सहभागामुळे उत्सव अधिकच आकर्षक ठरला.