महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया स्किल्स हबची उभारणी
महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया स्किल्स हबची उभारणी
परिवर्तनशील शिक्षण, संशोधन व उद्योग सहकार्यावर भर
मुंबई, ता. ३० ः राज्यातील औद्योगिक व शैक्षणिक परिसंस्थेला ऑस्ट्रेलियन कौशल्यांशी जोडून परिवर्तनशील शिक्षण, संशोधन व उद्योग सहकार्यासाठी महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया इनोव्हेशन अँड स्किल्स हब उभारण्यात येणार आहे. या हबच्या माध्यमातून ऊर्जा, पर्यावरण आणि आरोग्य क्षेत्रात संशोधन, नवकल्पना व कौशल्यविकासाला चालना मिळणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इनोव्हेशन अँड स्किल्स हबबाबत मंगळवारी (ता. ३०) बैठक झाली. या बैठकीला उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, ऑस्ट्रेलियामधील न्यू कॅसल विद्यापीठाचे प्रा. डॉ. अजयन विनू, कुलगुरू रजनीश कामत, कुलगुरू रवींद्र कुलकर्णी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. या वेळी मंत्री पाटील म्हणाले, महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया इनोव्हेशन अँड स्किल्स हब हा केवळ शैक्षणिक उपक्रम नाही, तर राज्याला एक शाश्वत ज्ञान अर्थव्यवस्थेत रूपांतरित करण्याचे ध्येय असलेला दूरदर्शी संकल्प आहे. हा हब ऑस्ट्रेलिया-इंडिया सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून कार्यरत राहणार आहे. मुंबई, पुणे व नागपूर ही राज्यातील शिक्षण व उद्योगांची केंद्रे असली तरी हवामान बदल, ऊर्जा मागणी आणि शाश्वत विकास या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक संशोधन व त्याचे व्यावसायिक रूपांतरण गरजेचे आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासन व ऑस्ट्रेलिया यांच्यातील सहकार्याचा नवा अध्याय या हबच्या माध्यमातून सुरू होणार आहे.
--
विविध संस्थांचा सहभाग
स्किल्स हबच्या उपक्रमामध्ये आयआयटी मुंबई, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्यासह राज्यातील अग्रगण्य संस्था, विद्यापीठ तसेच ऑस्ट्रेलियातील न्यूकॅसल, मोनॅश, आरएमआयटी व सिडनी विद्यापीठ सहभागी होणार आहेत. या माध्यमातून परदेशातील अभ्यासक्रम आणि विशेष कौशल्य प्रशिक्षण तसेच विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर संधी उपलब्ध होणार आहे.
--
संशोधनाची संधी
स्किल्स हबच्या माध्यमातून पीएचडी, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी प्रशिक्षित करणे, ऊर्जा व आरोग्य क्षेत्रातील किमान पेटंट तंत्रज्ञान विकसित करणे, तसेच आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांचे आदानप्रदान साध्य करणे, हे उद्दिष्ट ठरविण्यात आले असल्याची माहितीही या वेळी मंत्री पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.