झेंडुचा बाजारात बोलबाला
झेंडुचा बाजारात बोलबाला
फुले ओली असल्याने आवक घटली, किमंती वाढणार
तुर्भे, ता.३० (बातमीदार): पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नैसर्गिक संकटाचा झेंडू उत्पादकांनाही फटका बसला असून बाजारातील फुले ओली असल्याने कमी किंमतीत माल विकावा लागत आहे. त्यामुळे फुलांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
गणपती उत्सव, नवरात्रोत्सव-दसरा, दिवाळी पर्यंत झेंडूचे दर वाढलेले असतात. या काळात उस्मानाबाद, बीड, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात बाजारात फुले येतात. पितृ पंधरवड्यात झेंडूचा प्रती किलो बाजारभाव ३० ते ४० रुपये होता. नवरात्रीत भाव ६० ते ८० रुपयांवर होता. पण घाऊक बाजारात झेंडूंचा भाव किलोला ६० ते १०० रूपयांवर आहे. दसऱ्याला निमित्ताने होणारी अन्य आवकही जास्तच असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात झेंडुचा बोलाबाला राहण्याची शक्यता आहे.
--------------------
फुलांचे प्रकार सध्याचे भाव
पिवळा झेंडू ६० ते ८०
लाल झेंडू ८० ते १००
अस्टर १०० ते १२०
शेवंती १२० ते १५०
काफरी १०० ते १५०
-----------------------------
भाव वाढण्याची कारणे :
सणासुदीचा काळ : नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी सणांमध्ये झेंडूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यांची मागणी वाढते, दरही वाढतात.
मागणी, पुरवठा : जेव्हा फुलांची बाजारात मागणी जास्त असते, पण पुरवठा कमी असतो, तेव्हा दर वाढतात.
पिकांवरील परिणाम : अतिपाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्त्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास आवक घटते.
-----------------------------------
पावसामुळे रोपांचे नुकसान
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीत झेंडूची मागणी वाढल्याने दर वाढतात. आता काही ठिकाणी पावसाने उसंती घेतल्याने ओल्या फुलांवर उन्ह पडल्यास फुलांवर (टिक) काळे डाग पडतात. त्यामुळे फुलांवर औषध फवारणी करावी लागते. पण ही प्रक्रिया अतिशय महागडी असल्याने शेतकरी आस्मानीबरोबर आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच सततच्या पावसामुळे फुलांच्या रोपांचे नुकसान झाले आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणात मागणी असूनही फुलांचा पुरवठा होत नसल्याने भाववाढ होण्याची शक्यता अधिक आहे.
----------------------------
गणेशोत्सवात यंदा झेंडूच्या फुलांच्या किमती अधिक होत्या. पण गेले दोन महिने सुरू असलेल्या मुसळधार पावसाने फुलशेतीला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी फुलशेती कोलमडली आहे. उत्पादनापेक्षा मागणी जास्त आहे. त्यामुळे फुलांना चांगला बाजारभाव मिळत आहे. दसऱ्याला मागणीमुळे बाजारभाव वाढले आहे,
- बजरंग ओळवले, व्यापारी
़़़़़़़
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.