दिवाळे शाळेत विज्ञान प्रदर्शन

दिवाळे शाळेत विज्ञान प्रदर्शन

Published on

दिवाळे शाळेत विज्ञान प्रदर्शन
तुर्भे, ता.१ (बातमीदार) : विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एकमेव व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देशपातळीवर आपली कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याच्या हेतूने ''सीमेन्स'' कंपनीच्या माध्येमातून ''स्टीम इनोव्हेशन चॅलेंज २०२५'' अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.२ व शाळा क्र.११७ दिवाळे कोळीवाडा येथे ''जिज्ञासा'' विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनात इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात अन्न, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक, दळणवळण, नैसर्गिक शेती, आपत्ती व्यवस्थापन, गणितीय मॉडेलिंग, संगणकीय विचार, कचरा व्यवस्थापन, संसाधन व्यवस्थापन, रासायनिक कारखान्यांचे प्रदूषण तसेच, विज्ञान प्रयोगासाठी वापरण्यात येणारी उपकरणे, सुक्ष्मदर्शक यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी विविध प्रकारे मांडणी करण्यात आली होती. या विज्ञान प्रदर्शनातील उत्तम कौशल्यातील मांडणी केलेल्या एकुण तीस प्रकल्पांपैकी प्रथम क्रमांक खुशबु यादव, आंचल द्वितीय क्रमांक शबनम अन्सारी व तृतीय क्रमांक अंकित तर रोशन महतो आरव, प्रिन्स आणि आदित्य या विद्यार्थ्यांना विशेष सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सीमेन्स संस्थेचे मीडिया रिलेशनशिप प्रमुख बीजेश कामत, रितेश वाका, ऋतुजा कणकटे, रमेश सावंत हे प्रमुख पाहुणे तसेच पर्यवेक्षक म्हणून लाभले होते. यावेळी दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापिका सुहासिनी लोंढे व शोभा कुदळे, निशा कोळी, शिरीष पाटील, नयना तांडेल, सुवर्णा राठोड, प्रज्ञा सोनकांबळे, विद्या झरेकर, स्वाती तळेकर, प्रियंका पाटील, सारिका भोईर, प्रशांत खांडगे यांच्यासह शिक्षकवर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com