कोट चौकट
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विमानतळ नामकरणाचे पडसाद उमटणार नाहीत. विरोधक निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप करण्याची शक्यता आहे. भाजपाला त्याचा फटका बसणार नाही. कारण राज्य सरकारने सर्वपक्षीय कृती समितीचा प्रस्तावच केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. त्यामुळे भाजपलाच दोषी ठरवणे योग्य नाही
- अॅड.विकास पाटील, स्थानिक ग्रामस्थ
-----------------------------
विमानतळ नामकरणाची लढाई ही श्रेयवादाची असून भूमिपुत्राच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर परिणाम होणार, असे अजिबात वाटत नाही. विशेष म्हणजे, भाजप पक्षातील आमदार खासदार दि.बा.पाटील यांच्या नावासाठी आग्रही आहेत. त्यामुळे निवडणुकीमध्ये भाजपला फटका बसणार नाही.
- निशांत भगत, भाजप युवासेना
------------------------------
लोकनेते दि.बा. पाटील यांचा रक्तरंजित इतिहास पाहता नवी मुंबई विमानतलाला त्यांचे नाव देणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी समस्त आगरी समाज आग्रही आहे. जर तसे झाले नाहीतर त्याचे पडसाद आगामी निडणुकींमध्ये नक्कीच उमटतील.
- प्रताप पाटील, ग्रामस्थ
-------------------
नवी मुंबई विमनातळाळा दि.बा पाटील यांचे नाव दिलेच पाहिजे, अशी आमची सकल मराठा समाजाची मागणी आहे. त्यामुळे नाव दिले नाहीतर नवी मुंबईतील सकल मराठा समाज आगरी समाजासोबत नक्कीच रस्त्यावर उतरणार आहे.
- अॅड. अनंता पाटील, सकल मराठा समाज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.