कुटुंब नियोजनात पुरुष गायब
विरार, ता. १२ (बातमीदार) ः वसई-विरार महापालिका क्षेत्रात कुटुंब नियोजनाच्या बाबतीत महिलांच्या तुलनेत पुरुषांचा अल्प प्रतिसाद दिसून आलेला आहे. गेल्या पाच वर्षांत शहरात एकूण पाच हजार ७५३ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यामुळे पुरुषांची संख्या केवळ ११ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे; मात्र महिलांची संख्या तब्बल पाच हजार ७४२ आहे.
वसई-विरार महापालिका दोन रुग्णालये व २१ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून शहरवासीयांना आरोग्यसेवा पुरविते. भाजप कार्यकर्ते तसनीफ शेख यांनी माहिती अधिकार अर्जात माहिती मागविलेली होती. या अर्जाला उत्तर देताना वसई-विरार महापालिका वैद्यकीय आरोग्य विभागाने मागील पाच वर्षांतील आकडेवारी सादर केलेली आहे. पालिका रुग्णालयांत प्रसूत होणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. त्या तुलनेत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांची संख्या अल्प असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले. त्यातही महिलांच्या तुलनेत पुरुष याबाबत मौन पाळत असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. याबाबत पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांच्याशी संपर्क केला असता, पुरुषांमध्ये कुटुंब नियोजनासाठी जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
प्रशासनाकडून जागृती
गेल्या काही वर्षांत शहरी भागात एक किंवा दोन अपत्यांनंतर कुटुंब नियोजनाचा निर्णय घेतला जातो; मात्र ग्रामीण भागात आजही दोनपेक्षा अधिक अपत्ये जन्माला घातली जातात. सरकारतर्फे कुटुंब नियोजनासाठी आणि त्याच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. यात मोफत शस्त्रक्रिया उपलब्ध करून देणे, योग्य ते उपचार देणे, मोफत पद्धतीने दाम्पत्याला गोळ्या-औषधांचे वाटप करून देणे यांसारखे उपक्रम हाती घेण्यात येत असतात; मात्र पुरुष नसबंदीसाठी तयारच होत नसल्याचे सातत्याने दिसून येते. तर यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात पुढाकार दिसून येतो.
शहरातील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
वर्ष महिला पुरुष
२०२०-२१ ९६० १
२०२१-२२ १,३०७ ०
२०२२-२३ १,२६० ३
२०२३-२४ १,१३७ ५
२०२४-२५ १,०७८ २
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.