महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात रायगडची सुकन्या

महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात रायगडची सुकन्या

Published on

महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात रायगडची सुकन्या
महिलांच्या क्रिकेट संघात निवड, जिल्ह्यातील पहिली महिला खेळाडू
पोयनाड, ता. १ (बातमीदार) : महाडची सुकन्या रोशनी पारधीची महाराष्ट्राच्या वरिष्ठ गटातील महिलांच्या क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे रायगडच्या क्रिकेट इतिहासातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
आंतरजिल्हा १५ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत रोशनी पारधीने लागोपाठ तीन शतके झळकावत सर्वांचे लक्ष वेधले होते. रोशनी ही जलदगती गोलंदाज व सलामीवीर फलंदाज म्हणून आरडीसीएच्या संघातून खेळते. महाराष्ट्राच्या कनिष्ठ वयोगटाच्या संघात खेळतांना रोशनीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आपल्या अष्टपैलू क्रिकेट खेळाच्या जोरावर तिने आजवर आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत अनेक शतके ठोकली, तर अनेक फलंदाज बाद केले आहेत. अतिशय कमी वयात तिची उत्तुंग भरारी घेत रायगड जिल्ह्याचा नावलौलिक नाव खऱ्या अर्थाने वाढवला आहे. तिच्या निवडीनंतर आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदीप नाईक यांनी रोशनी, तिचे पालक आणि प्रशिक्षक आवेश चिचकर यांचे अभिनंदन केले.
-----------------------------
मुलींच्या गुणवत्तेला वाव
रायगड जिल्ह्यात मुलांच्या बरोबरीने मुलींमध्ये चांगल्या दर्जाची गुणवत्ता आहे. त्यांना योग्य संधी, प्रशिक्षण व त्यांना त्यांची गुणवत्ता दाखवण्यासाठी मोठे व्यासपीठ आरडीसीएच्या माध्यमातून उपल्ब्ध करून देणार असल्याचे अनिरुद्ध पाटील यांनी सांगितले. तसेच भविष्यात रोशनी पारधीने देशासाठी खेळावे, अशी इच्छा सर्वांची आहे, त्यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तिला सर्वोतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com