सार्वजनिक शौचालयांची समाजकंटकांकडून तोडफोड

सार्वजनिक शौचालयांची समाजकंटकांकडून तोडफोड

Published on

सार्वजनिक शौचालयांची समाजकंटकांकडून तोडफोड
नुकसानीमुळे पालिका गोंधळात, स्थानिकांकडून तीव्र नाराजी
वाशी, ता. १ (बातमीदार) ः स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबई महापालिकेकडून शहरातील विविध भागांत सुलभ शौचालये, सार्वजनिक शौचालये आणि मुताऱ्या उभारण्यात आल्या आहेत. दरम्यान, काही समाजकंटकांकडून या शौचालयांची वारंवार तोडफोड केली जात असल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. स्वच्छतेच्या उद्दिष्टाने उभारलेली ही सोय असामाजिक घटकांमुळे निष्फळ ठरत असून, स्वच्छतेची चकाकी बकालतेकडे वळत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
गणपती पाडा, रामनगर, मुकुंद कंपनी बसस्थानक, यादवनगर, इलठणपाडा आणि चिंचपाडा या झोपडपट्टी भागांत लाखो रुपयांच्या खर्चाने सार्वजनिक शौचालये आणि मुताऱ्या उभारण्यात आल्या आहेत, परंतु रात्रीच्या वेळी काही समाजकंटक शौचालयातील विद्युत दिवे, पाण्याचे नळ, बाहेरील रोषणाई तसेच पाण्याच्या टाक्यांचे पाइप तोडून टाकत आहेत. परिणामी या शौचालयांमध्ये अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले असून, विशेषतः महिलांना शौचालयाचा वापर करताना असुरक्षिततेचा आणि गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
पालिकेकडून नासधूस झालेल्या ठिकाणी तातडीने दुरुस्तीचे काम करून नवीन साहित्य बसवले जाते, मात्र काही समाजकंटकांमुळे पुन्हा तोडफोड होत असल्याने सार्वजनिक निधीचा अपव्यय होत आहे. या ठिकाणी नेमण्यात आलेले केअरटेकर हे फक्त सकाळच्या वेळेत उपस्थित असतात. रात्री कोणीही नसल्याने असामाजिक घटक संधी साधून शौचालयांमध्ये तोडफोड करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पालिकेने शहर स्वच्छ आणि सुशोभित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला आहे. दरम्यान, काही बेजबाबदार घटकांमुळे या सुविधांची दुर्दशा होत असून, नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

बॉक्स
नवी मुंबई महापालिकेकडून उभारलेल्या सार्वजनिक शौचालयांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येते; मात्र काही समाजकंटकांकडून शौचालयांची नासधूस केली जाते. यासाठी नागरिकांनीही दक्ष राहून अशा घटनांची माहिती तत्काळ पालिकेला कळवावी.
- डॉ. अजय गडदे, उपआयुक्त, नवी मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com