क्षयरोग नियंत्रणासाठी राबवल्‍या प्रभावी उपाययोजना

क्षयरोग नियंत्रणासाठी राबवल्‍या प्रभावी उपाययोजना

Published on

क्षयरोग नियंत्रणासाठी राबवल्‍या प्रभावी उपाययोजना
डॉ. दक्षा शहा यांच्या कामगिरीची दखल
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. दक्षा शहा यांनी मुंबईतील क्षयरोग नियंत्रणात राहावा, यासाठी आरोग्य क्षेत्रात मोलाचा सहभाग दिला. ‘निक्षय मित्र’ यासारखी संकल्पना पुढे आणून क्षय रुग्णांच्या पोषक आहारासाठी पाठिंबा दिला.
डॉ. दक्षा शहा यांनी काेरोना आणि इतर काळात केलेल्‍या कामगिरीची दखल घेत अनेक पुरस्‍कारांनी त्‍यांना गौरवण्यात आले आहे. ऑर्गनायझेशन ऑफ फार्मास्युटीकल प्रोड्युसर ऑफ इंडियाने त्‍यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवले आहे. यापुढेही आणखी अनेक आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याचे आव्हान त्यांनी पेलले आहे.
एचआयव्ही आणि क्षयरोग या दोन्ही आजारांसाठी दीर्घकाळ चालणारे उपचार केले जातात. त्यामुळे दोन्ही आजारांसाठी विशेष लक्ष देणे, त्याचसोबत समाजात काम करणे गरजेचे आहे. या कामात खासगी डॉक्टर, खासगी रुग्णालये, प्रयोगशाळा, इतर संस्था, युनिसेफ, युएसआयडी, गेट्स या संस्था जोडल्या गेल्या आहेत. त्यांचा सहभाग करून घेणे हे खूप आव्हानात्मक असते. आता असंसर्गजन्य आजार आणि कर्करोगावर लक्ष देण्याची अधिक गरज असल्याचे डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.
डॉ. दक्षा शहा यांनी महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी म्हणून जुलै २०२३ मध्ये पदभार स्वीकारला. त्‍यानंतर ‘एनसीडी’ हा कर्करोग कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. यात महिलांच्या कर्करोगाचा प्रतिबंध, तपासणी आणि कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यात सुरुवात केली. यात गर्भाशयाच्या मुखाचा आणि स्तन कर्करोगावर टाटा रुग्णालयांसोबत आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येत आहेत. यासह आपला दवाखाना, प्रसूतिगृहातही जनजागृती व तपासणीला भर त्‍यांनी दिला.

बीपाल उपचार पद्धतीला सुरुवात
औषधे लागू न होणाऱ्या बहुऔषध-प्रतिरोधक क्षयरोगावर (एमडीआर टीबी) नियंत्रण मिळवण्यासाठी ‘बीपाल’ उपचार पद्धतीला डॉ. दक्षा शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली. आपला दवाखानाची संख्या वाढवून अत्‍याधुनिक सुविधांवर भर दिला. दिलासा सेंटरची व्याप्ती वाढवून रुग्णालयांसोबत आता प्रसूतिगृहातही मानसिक व शारीरिक अत्याचार झालेल्या महिलांचे समुपदेशन करण्यात येत आहे.

काम सांभाळून जपली नृत्याची आवड
३० वर्षे पालिकेत वेगवेगळ्या भूमिकेत दिसणाऱ्या डॉ. दक्षा यांनी आपली एक वेगळी आवड ही लहानपणापासून जपली. लोकनृत्याची आवड जपत आजही त्या कार्यालयातील महत्त्वाच्या कार्यक्रमात हिरिरीने सहभागी होतात.

कायम सतर्क राहावे लागले
आरोग्‍य क्षेत्रात काम करताना कायम सतर्क राहावे लागते, असे दक्षा शहा यांनी सांगितले. औषध, निदान, मनुष्यबळ, प्रशासन, सर्व दवाखाने, राष्ट्रीय कार्यक्रम, प्रसूतिगृह, नर्सिंग होम, विविध कार्यक्रम, लेप्टो, डेंगी, मलेरिया नियंत्रण कार्यक्रम, संसर्गजन्य आजार प्रतिबंध, नियंत्रण, इतर सर्वेक्षण कार्यक्रम घेतले जातात. मधुमेह आणि रक्तदाब हे आजार टाळता येतील, पण प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे, असे डॉ. दक्षा यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com