महिला सभापतीमुळे रणनीती बदलणार
मोखाडा, ता. २ (बातमीदार) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रशासनाकडून पंचायत समितीच्या सभापतीपदाची सोडत काढली आहे. पालघर जिल्ह्यातील वसई, मोखाडा, डहाणू, विक्रमगड या चार पंचायत समित्यांचे सभापतीपद अनुसूचित जमाती महिला राखीव झाले आहे. त्यामुळे चार पंचायत समितींवर महिलाराज असणार आहे. सभापतीपद महिला राखीव झाल्याने राजकीय पक्षांची रणनीती बदलणार आहे.
गेल्या वर्षभरापासून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी करत आहेत, तर प्रशासन विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागले आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण झाले. त्यानंतर ३० सप्टेंबरला पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण जाहीर झाले. या आरक्षणानंतर खऱ्या अर्थाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
तालुका पंचायत समिती सभापतीपदावर डोळा ठेवून अनेक राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी वर्षभरापासून मोर्चेबांधणी केली आहे. तालुक्याचा प्रथम नागरिक होण्याचा मान मिळवण्यासाठी वर्षांपासून अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. त्यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांनी राजकीय, सामाजिक उपक्रम राबवले आहेत, मात्र सभापतीपद महिला राखीव झाल्याने त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त झाले आहे.
सक्षम महिला उमेदवाराचा शोध
तालुक्याचे सभापतीपद महिला राखीव झाल्याने राजकीय पक्षांतील हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांत महिला कार्यकर्त्या आहेत, मात्र त्यामधील किती महिला सभापतीपदासाठी सक्षम आहेत, निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत का? याचा शोध घेणे राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सुरू केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.