अतिक्रमण उपायुक्त लाच घेताना जाळ्यात

अतिक्रमण उपायुक्त लाच घेताना जाळ्यात

Published on

अतिक्रमण निर्मूलन उपायुक्त लाच घेताना जाळ्यात
वर्धापनदिनालाच ठाणे महापालिका हादरली

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला ठाणे महापालिकेचा ४३वा वर्धापनदिन थाटात साजरा होत असतानाच मुख्यालयामध्ये अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त लाच घेताना मुंबई एसीबीच्या जाळ्यात अडकल्याचे कळते. शंकर पाटोळे असे या अधिकाऱ्याचे नाव असून, अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तपदी बढती दिल्यापासूनच ते वादात सापडले होते. आता मुख्यालयातच सुमारे २५ लाखांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडले असल्याचे समजते.
यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी झाली असून, रात्री उशिरापर्यंत पंचनामे आणि गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू होती. अनधिकृत बांधकामांवरून ठाणे महापालिका गाजत असून, भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप सातत्याने होत आहे. यामध्ये वर्षभरापासून शंकर पाटाळे यांचे नाव जोडले जात होते. गेल्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये सहाय्यक आयुक्त पदावरून त्यांना उपायुक्तपदी बढती मिळाली होती. त्यांंच्याकडे अतिक्रमण निर्मूलन विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तेव्हापासूनच ते अनेकांच्या हिटलिस्टवर होते; पण बुधवारी ठाणे महापालिकेच्या वर्धापनदिनाची धामधूम सुरू असताना त्यांच्या कार्यालयात मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला आणि त्यात ते रंगेहाथ सापडले.
...
आधी घेतले १० लाख
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी एका विकसकाकडून कारवाई थांबवण्यासाठी ३५ लाख लाचेची मागणी केली होती. त्यातील १० लाखांचा हप्ता त्यांनी आधीच घेतला होता. राजकीय वरदहस्तामुळे ठाण्यात पाटोळे यांच्यावर कारवाई होणे अवघड वाटत असल्याने फिर्यादीने थेट मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com