निसर्ग, पक्षी संवर्धनाचा संदेश
नवरात्रोत्सवात निसर्ग, पक्षी संवर्धनाचा संदेश
योगदान फाउंडेशन ट्रस्टचा पर्यावरणपूरक उपक्रम
टिटवाळा, ता. २ (वार्ताहर) : नवरात्र हा केवळ भक्तीचा नव्हे तर समाजजागृतीचाही उत्सव आहे. या उत्सवाचेच औचित्य साधत योगदान फाउंडेशन ट्रस्टतर्फे यंदा नवरात्रोत्सवात निसर्ग व पक्षी संवर्धनाचा विशेष संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. धावपळीच्या जीवनशैलीत माणसाचे निसर्गाशी नाते कमी होत आहे. तसेच व प्रदूषणामुळे पक्ष्यांची संख्या झपाट्याने घटत असल्याने याकडे लोकांचे लक्ष वेधण्याचा आणि जनजागृती करण्याचा या उपक्रमामागचा उद्देश आहे.
जनजागृतीसाठी आकाश झेप या माहितीपटातील महत्त्वपूर्ण अंश समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आले. फेसबुक, यूट्युब, रेडिओ आणि विविध समाजमाध्यमांतून पर्यावरण संरक्षणाचे प्रेरणादायी संदेश जनतेपर्यंत पोहोचले. नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत ट्रस्टच्या प्रयत्नांचे कौतुक केले. पर्यावरण आणि पक्ष्यांविषयी समाजात सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी या माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
फाउंडेशनने स्पष्ट केले की मानव आणि निसर्ग यांचे नाते अतूट आहे. पक्षी हे पर्यावरणाचे संतुलन राखणारे महत्त्वाचे घटक असून, त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. निसर्गाचे जतन केले तरच भावी पिढ्यांना सुरक्षित आणि आरोग्यदायी आयुष्य मिळू शकेल. त्यासाठी विशेषतः तरुण पिढीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासोबतच ट्रस्टने आणखी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना निसर्ग व पक्षी संवर्धनाची आवड निर्माण करण्यासाठी “आकाश झेप” माहितीपटाचे विशेष आयोजन करण्यात येणार आहे. शालेय स्तरावरून मुलांमध्ये पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता वाढवणे आवश्यक असल्याचे ट्रस्टचे मत असून, या उपक्रमासाठी शाळांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तरुणाईसाठी प्रेरणादायी
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिलेला हा संदेश समाजातील पर्यावरणप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी आणि तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरत असून, या प्रयत्नामुळे निसर्ग व पक्ष्यांविषयीचा जिव्हाळा अधिक दृढ होईल, असा विश्वास ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.