श्रीवर्धन शिक्षण, विज्ञान आणि पर्यटनाचे केंद्र होणार

श्रीवर्धन शिक्षण, विज्ञान आणि पर्यटनाचे केंद्र होणार

Published on

श्रीवर्धन शिक्षण, विज्ञान आणि पर्यटनाचे केंद्र होणार
खासदार सुनील तटकरे यांचा विश्वास
श्रीवर्धन, ता. २ (वार्ताहर) : शहराच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे आगामी काळात हे ठिकाण शिक्षण, विज्ञान आणि पर्यटनाचे केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. नगर परिषद शाळा क्रमांक दोन येथे बुधवारी (ता. १) संध्याकाळी ७ वाजता १५० हेरिटेज पद्धतीचे सौर दिवे आणि १२ हायमास्ट सौर दिव्यांच्या लोकार्पण सोहळा खासदार तटकरे यांच्या हस्‍ते करण्यात आला.
या वेळी खासदार तटकरे म्हणाले की, सौरऊर्जेवर चालणारे हे दिवे श्रीवर्धनला पर्यावरणपूरक, आधुनिक आणि आकर्षक रोषणाई देणार आहेत. शहराच्या दृश्य सौंदर्यात भर घालतानाच ऊर्जा बचतीचे उत्तम उदाहरण ठरणार आहेत. तसेच श्रीवर्धनमध्ये लवकरच तारांगण प्रकल्प साकार होणार असून, तो विद्यार्थ्यांसाठी तसेच पर्यटकांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून घेता येईल, तर पर्यटकांना हे एक नवे आकर्षण ठरणार आहे. त्याचबरोबर जीवनाबंदर येथील आधुनिक जेट्टी व मुळगाव कोळीवाडा येथील ग्रोयान्स पद्धतीचा बंधारा ही कामे पूर्णत्वास आल्यावर किनारी भागातील मासेमार आणि पर्यटक दोघांनाही सुविधा उपलब्ध होतील. तसेच त्‍यांनी पुढे सांगितले की, श्रीवर्धनमधील शाळांचे आधुनिकीकरण सुरू असून, विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सोयी-सुविधा मिळतील. शिक्षण आणि विज्ञान क्षेत्राला गती देणारे हे प्रकल्प स्थानिक मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे ठरतील. या सर्व उपक्रमांमुळे श्रीवर्धनची एक वेगळी ओळख निर्माण होईल. हे शहर केवळ ऐतिहासिक वारशासाठी नव्हे तर शिक्षण, विज्ञान आणि पर्यटनासाठीदेखील प्रसिद्ध होईल, असे तटकरे या वेळी म्हणाले. या सोहळ्याला नगर परिषद मुख्याधिकारी व प्रशासक विराज लबडे, नगर परिषद अधिकारी, कर्मचारीवृंद तसेच माजी नगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते. लोकार्पणावेळी उपस्थित मान्यवरांनीही या प्रकल्पामुळे शहराला मिळणाऱ्या नव्या रूपाबद्दल समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com