वनमंत्री गणेश नाईक यांच्या सुवर्णमहोत्सवी कार्याचा गौरव
वनमंत्री गणेश नाईक यांच्या सुवर्णमहोत्सवी कार्याचा गौरव
तुर्भे, ता. २ (बातमीदार) : वनमंत्री गणेश नाईक यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध सामाजिक उपक्रमांचा समारोप वाशी येथील एक्झिबिशन सेंटर सभागृहात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने सलग १५ दिवसांत १०१ सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आरोग्य शिबिरे, ज्येष्ठ नागरिकांचा गौरव, गरीब-गरजूंना मदत, विद्यार्थी व महिलांसाठी उपक्रम यांचा समावेश होता.
समारोप सोहळ्यास माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे, तसेच अनेक नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील महत्त्वाच्या प्रश्नांवर थेट भूमिका घेतली. त्यांनी सांगितले की, आगामी काळात नवी मुंबईकरांच्या जलसमृद्धीसाठी कर्जत तालुक्यातील पोशिर धरणातून ५०० एमएलडी पाणी मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी जवळपास चार हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजक दशरथ भगत यांनी गणेश नाईक यांच्या ५० वर्षांच्या सामाजिक व राजकीय प्रवासाचा आढावा सादर केला. मोरबे धरणाला ‘श्रीगणेश सरोवर’ हे नाव देऊन हा परिसर तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्याची मागणीही त्यांनी केली. या वेळी सामाजिक पंधरवड्यातील विविध उपक्रमांचे छायाचित्र व माहितीपर स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सोहळ्यातील एक विशेष आकर्षण म्हणजे शंभरीपार व ७५ वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचा धान्यतुला करून सन्मान केला गेला. गोळा झालेले धान्य विविध सामाजिक संस्था आणि गरजूंना देण्यात येणार असल्याचे संयोजक निशांत भगत व संदीप भगत यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.