सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत महसूल विभागाचा मेळावा

सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत महसूल विभागाचा मेळावा

Published on

‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत महसूल विभागाचा मेळावा
आदिवासी बांधवांना वनहक्क नकाशे, रेशनकार्ड, जात प्रमाणपत्रे, सातबारा वाटप
पनवेल, ता.२ (बातमीदार) ः महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान अंतर्गत ‘सेवा पंधरवडा’ उपक्रम साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील सिद्धीविनायक मंगल कार्यालय, बेलवली येथे महसूल विभागाच्यावतीने विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शिबिरात आदिवासी बांधवांना सामुदायिक वनहक्क जमिनींचे दोन नकाशे, दोन रेशनकार्ड, ५० जातीचे दाखले, दोन आयुष्यमान भारत कार्ड तसेच जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत दोन सातबारा उतारे यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी कष्टकरी मुक्ती संघटनेचे अध्यक्ष मधुकर पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या समस्या मांडून शासनाने त्यावर उपाययोजना करण्याचे आवाहन केले. त्यावर लवकरच प्रशासनाला आदेश दिले जातील, असे आश्वासन आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी दिले. त्यानंतर त्यांनी मौजे पोयंजे येथील ग्राम महसूल कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व अंगणवाडी यांना भेट देऊन कर्मचारी व ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच पोयंजे गावठाण ते तलावकाठ रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या कार्यक्रमाला अपर आयुक्त (महसूल) वैशाली इंदाणी-उंटवाल, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, अपर तहसीलदार जितेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी वठारकर, निवासी नायब तहसीलदार शेलार, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते

Marathi News Esakal
www.esakal.com