तिसऱ्या डोळ्याने लावली शिस्त

तिसऱ्या डोळ्याने लावली शिस्त

Published on

तिसऱ्या डोळ्याने लावली शिस्त
वाहनचालकांच्या बेशिस्तपणात झाली घट
ठाणे शहर, ता. २ (बातमीदार) ः वाहनचालकांचा बेशिस्तपणा टिपण्यासाठी कॅडबरी चौकात लावलेल्या कॅमेऱ्यांचा वाहनचालकांनी धसका घेतला असून, वाहतूक नियमांचा भंग करण्याच्या प्रमाणात घट होत असल्याचे दिसून येत आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर ऑनलाइन दंडाचा पाऊस पडू लागताच वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत. केवळ याच चौकात नव्हे, तर शहरातील इतर मुख्य चौकांमध्येही त्यांच्या वाहन चालवण्यात बदल होत असल्याचे दिसत आहे.
वाहतूक विभागाने पोलिस आयुक्तालयातील मुख्य चौकांमध्ये आयटीएमएस तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक कॅमेरे बसवले आहेत. उपविभागातील १४ चौकांमध्ये ३५० कॅमेरे बसवण्याचे काम हाती घेतले असून, लवकरच ते पूर्ण होणार आहे. या उपक्रमाचा पायलट प्रोजेक्ट ठाण्यातील कॅडबरी चौकात सुरू करण्यात आला असून, येथे नियमभंग करणाऱ्यांना ऑनलाइन दंड पाठवण्यासाठी १२ आधुनिक कॅमेरे बसविले आहेत. ४ सप्टेंबरपासून सुरू केलेल्या या यंत्रणेने कॅडबरी चौकात १२ हजार ६९१ जणांवर ऑनलाइन दंडाची कारवाई केली.

ठिकठिकाणी दंडाची वसुली
वाहतूक पोलिसांकडून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करून झालेल्या ऑनलाइन दंडाची वसुली केली जात आहे. दंडाच्या भीतीमुळे इतर मुख्य चौकांमध्येही वाहनचालकांना शिस्त लागत असल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत असल्याने वाहतूक विभागाने सुरू केलेला उपक्रमाचा खरा हेतू साध्य होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. दरम्यान, लवकरच सर्व ठिकाणी कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण होणार असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

१६ सप्टेंबर - जम्पिंग सिग्नल - ७०४, विनाहेल्मेट - २४०, स्टॉप लाईन ओलांडणे - ७, ट्रिपल सीट - ११
१७ सप्टेंबर - जम्पिंग सिग्नल -९०७, विनाहेल्मेट - १६१, स्टॉप लाईन ओलांडणे - ८, ट्रिपल सीट - ६
१८ सप्टेंबर : जम्पिंग सिग्नल - ८६६, विनाहेल्मेट - १७०, स्टॉप लाईन ओलांडणे - ५३, ट्रिपल सीट - ९
१९ सप्टेंबर : जम्पिंग सिग्नल - ६५१, विनाहेल्मेट - २२१, स्टॉप लाईन ओलांडणे - ६६, ट्रिपल सीट - ५
२१ सप्टेंबर : जम्पिंग सिग्नल - २०६, विनाहेल्मेट - १९२, स्टॉप लाईन ओलांडणे - २९, ट्रिपल सीट - ११
२३ सप्टेंबर : जम्पिंग सिग्नल - ५४२, विनाहेल्मेट - १०७, स्टॉप लाईन ओलांडणे - २७, ट्रिपल सीट - ४
२४ सप्टेंबर : जम्पिंग सिग्नल - ५५८, विनाहेल्मेट - १३७, स्टॉप लाईन ओलांडणे - २७, ट्रिपल सीट - ८
२५ सप्टेंबर : जम्पिंग सिग्नल - ५०५, विनाहेल्मेट - ९१, स्टॉप लाईन ओलांडणे - ४६, ट्रिपल सीट - ३

कॅमेरे बसवण्यामागे दंड वसुलीचा हेतू नाही. या माध्यमातून वाहनचालक नियमांचा भंग करून स्वतःसह इतरांच्या जीविताला धोका निर्माण करू नये हा आहे. सुरुवातीला या चौकात मोठ्या प्रमाणात नियमभंग झाले, मात्र आता त्यात मोठी घट होऊ लागली आहे. ही नक्कीच आनंदाची बाब आहे.
- पंकज शिरसाट, पोलिस उपायुक्त वाहतूक


फोटोओळ :
ठाणे ः कॅडबरी चौकातील वाहतुकीला शिस्त लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com