वॉटर मेट्रोसाठी सल्लागारांची नियुक्ती

वॉटर मेट्रोसाठी सल्लागारांची नियुक्ती

Published on

वॉटर मेट्रोसाठी सल्लागारांची नियुक्ती
कोची मेट्रो रेल लिमिटेड संस्थेची निवड; डिसेंबरअखेर अहवाल

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः कोचीच्या धर्तीवर मुंबईतही ‘वॉटर मेट्रो’ सेवा सुरू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली असून, येत्या डिसेंबरअखेरपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी कोची मेट्रो रेल लिमिटेड (केएमआरएल) या अनुभवी संस्थेची निवड करण्यात आली आहे.

कोचीमध्ये २०२३ मध्ये यशस्वीपणे सुरू झालेल्या वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात जलवाहतुकीसाठी नवे दार खुले झाले. कोची मेट्रोने उभारलेल्या हायब्रीड इलेक्ट्रिक बोट्स, आधुनिक टर्मिनल्स आणि स्मार्ट तिकिटिंग प्रणालीमुळे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर झाला. आता हाच अनुभव मुंबईत उतरवण्याची तयारी सुरू आहे. मुंबईत वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आठ महत्त्वाच्या मार्गांवर जलवाहतूक सेवा सुरू होणार आहे. यामध्ये नरिमन पॉइंट-वांद्रे आणि वांद्रे-वर्सोवा हे दोन प्रमुख मार्ग निश्चित झाले आहेत. उर्वरित सहा मार्गांवर सध्या काम सुरू असून, यात मिरा-भाईंदर, वसई, गेटवे ऑफ इंडिया, मांडवा, ऐरोली, बेलापूर, कल्याण अशा भागांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

लोकलमधील गर्दीला पर्याय
‘वॉटर मेट्रो’ प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र सागरी महामंडळाकडे सोपवण्यात आली असून, स्थानिक प्रशासन, पोर्ट ट्रस्ट आणि पर्यावरण विभागाशी समन्वय साधून काम सुरू आहे. जागा अधिग्रहण, परवानग्या, टर्मिनल्सचे नियोजन, बोटींची निर्मिती या सर्व टप्प्यांवर काम वेगाने सुरू आहे. वॉटर मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना एक नवीन, पर्यावरणपूरक आणि जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि लोकलमधील गर्दीला पर्याय म्हणून ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. शिवाय, ही सेवा पर्यटनाच्या दृष्टीनेही मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकते.


डिजिटल तिकीट सुविधा
मुंबई वॉटर मेट्रोमध्येही हायब्रीड इलेक्ट्रिक बोट्स, वातानुकूलित टर्मिनल्स, क्यूआर कोड तिकीट बुकिंग, मोबाइल अ‍ॅप अशा आधुनिक सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, प्रवाशांना ‘कॉमन कार्ड प्रणाली’ मिळणार आहे. म्हणजेच, एकाच कार्डने लोकल, मेट्रो, बस आणि वॉटर मेट्रो सर्व सेवांचा वापर करता येणार असल्याची माहिती सागरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

देशातील पहिला जल मेट्रोसेवा
कोची वॉटर मेट्रोची वैशिष्ट्ये उल्लेखनीय आहेत. सुमारे ७४७ कोटी रुपयांच्या खर्चाने उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या प्रकल्पात ७८ हायब्रीड इलेक्ट्रिक बोट्स आणि ३८ टर्मिनल्स तयार करण्यात येत आहेत. बोट्समध्ये वातानुकूलित यंत्र, वायफाय, सीसीटीव्ही आणि स्वयंचलित दरवाजे अशा सुविधा असून, कोची शिपयार्डमध्येच या बोट्स तयार करण्यात आल्या आहेत.

संभाव्य मार्ग
नारंगी-खारवाडेश्वर
वसई-मिरा-भाईंदर
फाउंटन जेट्टी-गायमुख-नारगी
कोलशेत-काल्हेर-मुंब्रा-कल्याण
कल्याण-मुंब्रा-मुलुंड-ऐरोली
वाशी-भाऊचा धक्का
भाईंदर-वसई-बोरिवली
नरिमन पॉइंट-मांडवा
बेलापूर-गेटवे-मांडवा
बोरिवली-गोराई-नरिमन पॉइंट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com