अक्षय कुमारच्या मुलीला अश्लील फोटोची मागणी

अक्षय कुमारच्या मुलीला अश्लील फोटोची मागणी

Published on

अक्षय कुमारच्या मुलीकडे अश्लील फोटोची मागणी 
मुंबई पोलिसांच्या ‘सायबर जागरूकता महिना २०२५’चे उद्‍घाटन


मुंबई, ता. ३ ः अभिनेता अक्षय कुमारने आपल्या मुलीबद्दल थरारक अनुभव उघड केला. अक्षयची मुलगी काही महिन्यांपूर्वी मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळत असताना एका अनोळखी व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला त्या व्यक्तीने मैत्रीपूर्ण संदेश पाठवले; पण नंतर अचानक मुलीला अश्लील फोटो पाठविण्याची मागणी केली. अक्षयच्या या धक्कादायक माहितीनंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता अशा ऑनलाइन गेमिंगबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मुंबई पोलिसांच्या ‘सायबर जागरूकता महिना २०२५’चे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. ३) करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेता अक्षय कुमार आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. या वेळी अक्षय कुमार म्हणाला, की ‘माझ्या मुलीसोबत घडलेल्या घटनेनंतर तिने धैर्य दाखवत त्वरित मोबाईल बंद केला आणि आईकडे जाऊन संपूर्ण प्रसंग सांगितला. हीच खरी जागरूकता आहे. अनेक मुले या जाळ्यात अडकतात, ब्लॅकमेल होतात आणि काहींचा तर जीव जातो. माझ्या मुलीने वेळेवर योग्य पाऊल उचलले,’ असेही त्याने स्पष्ट केले. या प्रसंगानंतर अक्षयने शाळांमध्ये सायबर शिक्षणाची गरज अधोरेखित केली. ‘इतिहास, गणित शिकवतात; पण ऑनलाइन जगात दोन प्लस दोन कधी शून्य होऊ शकते, हेही मुलांना शिकायला हवे. सरकारकडे विनंती आहे की, इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दर आठवड्याला सायबर सुरक्षेचा तास ठेवावा,’ अशी मागणीही अक्षयने केली.

जागरूकता महत्त्वाची : राणी मुखर्जी
अभिनेत्री राणी मुखर्जी हिने सांगितले, की ‘आज सायबर गुन्हे विशेषतः महिलांवर आणि मुलांवर होणारे गुन्हे आपल्या घराघरात शिरत आहेत. जेव्हा कुटुंबांना कसे सुरक्षित राहायचे आणि मदत कुठे मिळेल, हे माहीत असते, तेव्हाच खरी सुरक्षा सुरू होते. ‘डायल १९३० आणि डायल १९४५’ या हेल्पलाइनमुळे सर्वांना मदत होत आहे. एक कलाकार म्हणून मी पडद्यावर कथा जिवंत करते; पण एक स्त्री, एक आई आणि एक नागरिक म्हणून मला वाटते, की हे आपले सामूहिक कर्तव्य आहे, की कोणत्याही स्त्रीला कुठेही असुरक्षित वाटू नये, यासाठी सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता महत्त्वाची आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com