वाहतूक कोंडीला बोगद्यांचा उतारा

वाहतूक कोंडीला बोगद्यांचा उतारा

Published on

वाहतूक कोंडीला बोगद्यांचा उतारा
पालिकेकडून शहरासह उपनगरात उभारणी


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरातील होणारी कोंडी फोडण्यासाठी पालिकेने सहा बोगदे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाढती वाहतूक बोगद्यामार्गे वळविली, तर वाहतूक कोंडी सुटण्याची शक्यता आहे.

वाढती लोकसंख्या आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांना परस्परांशी जोडणारे तब्बल सहा बोगदे उभारण्यात येणार आहेत. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यांचे जाळे वाढवणे आणि भुयारी मार्गांचा विकास करणे, हा या संपूर्ण प्रकल्पामागील मुख्य उद्देश असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केल्याची माहिती पालिकेने दिली. दरम्यान, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड आणि मुंबई किनारी रस्ता (कोस्टल रोड पहिला व दुसरा टप्पा) यांच्याशी प्रस्तावित सर्व बोगदे जोडले जाणार आहेत. या बोगद्यांमध्ये अत्याधुनिक वायुवीजन व्यवस्था, डिजिटल नियंत्रण प्रणाली, आकर्षक प्रकाशयोजना, स्वतंत्र सेवा मार्ग तसेच आवश्यक अतिरिक्त नेटवर्क सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे वाहतुकीचा प्रवाह सुरळीत होऊन प्रवाशांचा वेळ आणि इंधनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

दक्षिण मुंबईत दुहेरी बोगदा
दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या दुहेरी बोगद्याचे कामही सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला एकूण १३५४.६६ कोटी रुपयांचे बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य मंजूर केले आहे. यामध्ये केंद्रीय करासाठी ३०७.२२ कोटी, राज्यस्तरीय करांसाठी ६१४.४४ कोटी, तर जमीन अधिग्रहण आणि इतर खर्चासाठी ४३३ कोटींचा समावेश आहे.

बोगद्यांसाठी असा होईल खर्च
प्रत्येकी बोगदा ७३२ कोटी
मुंबई महापालिका ४,३९२ कोटी
ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगदा १३५४ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com