विकासाचे ‘पुष्पक’नगरी केंद्र

विकासाचे ‘पुष्पक’नगरी केंद्र

Published on

विकासाचे ‘पुष्पक’नगरी केंद्र
विमानतळामुळे सुविधांचे केंद्र, दळणवळणासाठी सर्वोत्तम
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ४ ः पुष्पकनगर परिसरात अत्याधुनिक दर्जाची क्रीडा संकुले, तारांकित हॉटेल, विद्यापीठे, सेंटर पार्कसाठीचे भूखंड राखीव ठेवण्यात आले आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या परिसराला अनन्यसाधारण असे महत्त्व आले आहे. अशातच दळणवळणाच्या दृष्टीनेदेखील हा परिसर अतिशय उपयुक्त असल्याने भविष्यात पुष्पकनगर परिसर विकासाचे केंद्रबिंदू राहणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये १० गावांमधील जमीन संपादित करण्यात आली. प्रकल्पग्रस्तांना साडेबावीस टक्के विकसित भूखंड पुष्पकनगर येथे देण्यात आले. त्याचबरोबर सिडकोचेही काही भूखंडे येथे उपलब्ध आहेत. दापोली गावाच्या हद्दीत साडेचारशे एकरवर ही वसाहत विकसित होत आहे. मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प या ठिकाणी उभे राहत आहेत. जेएनपीटी महामार्गालगतच्या पुष्पकनगरात १० सेक्टर आहेत. तसेच मुंबई ते नवी मुंबई मेट्रो प्रस्तावित आहे. त्याचबरोबर त्याचबरोबर विरार-अलिबाग मल्टी कॉरिडोरहीसुद्धा येथूनच जातो, शिवाय पनवेल-उरण रेल्वे लोकल सेवासुद्धा प्रस्तावित आहे. त्यामुळे दळणवळण तसेच अत्याधुनिक सुविधांमुळे गृहसंकुलांसाठी अधिक पसंती मिळत आहे.
--------------------------
नोडमधील विविध सुविधा
सेक्टर-१ - गावठाणाचे पुनर्वसन करण्यात आले. बाजूच्या सेक्टरमध्ये मिनी सेंटर पार्क आहे. या ठिकाणी विविध सोयीसुविधा असणार आहेत. याच ठिकाणी मलनिस्सारण केंद्र, रुग्णालयेसुद्धा आहेत.
सेक्टर-३ - अग्निशमन केंद्र, पोलिस ठाणे, रेल्वे स्टेशन, क्रीडांगण, कल्चरल सेंटर, जॉगिंग ट्रॅकचे नियोजन आहे. दोन विभागाच्या मध्ये जेएनपीटी हायवेखालून बोगदे तयार करण्यात आले आहेत. जेणेकरून या ठिकाणी नागरिकांना जाता-येता येईल.
सेक्टर-४ - बांधकाम व्यावसायिकांनी इमारती बांधण्याचे काम हाती घेतले आहे. याच सेक्टरमध्ये मंदिर, तलाव, उद्यानाचे नियोजन आहे.
सेक्टर-५ - जेएनपीटी महामार्गालगत पंचतारांकित हॉटेलसाठी भूखंड आहे. पनवेल परिसरातील आणि दक्षिण नवी मुंबईतील पहिले पंचतारांकित हॉटेल असणार आहे. याच सेक्टरमध्ये बाजारासाठीचे मोठे भूखंड आरक्षित आहे.
सेक्टर-७ - विद्यापीठे, शाळा असणार आहे. बसडेपोसुद्धा असणार आहे. क्रीडा संकुलात आऊट, इंनडोअर गेम असणार आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्विमिंग पूल आणि इतर खेळांकरिता सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.
सेक्टर-८ - पेट्रोलपंपाची सुविधा आहे.
सेक्टर-१० - पाच लाख लिटर पाणी साठवून ठेवण्यासाठी टाक्या बांधण्यात येणार आहेत. एका जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे.
------------------------------------
पुष्पकनगर केवळ एक गृहनिर्माण प्रकल्प नसून भविष्यातील अत्याधुनिक शहराचा आराखडा आहे. विमानतळ, मेट्रो, मल्टी कॉरिडोर महामार्ग अशा जागतिक दर्जाच्या दळणवळणांच्या साधनांसह येथे पंचतारांकित हॉटेल, विद्यापीठ, क्रीडा संकुले अशा सोयी निर्माण होणार आहेत. त्यामुळे भविष्यात पुष्पकनगर गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प उभे करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
- अक्षय पानसरे, बांधकाम व्यावसायिक, नवी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com