एफ-टीएएमतर्फे ठाण्यात भव्य दसरा स्नेह संमेलन
एफ-टीएएमतर्फे ठाण्यात दसरा स्नेहसंमेलन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : महाराष्ट्र तेलुगू असोसिएशन (एफ-टीएएम)च्या वतीने ठाण्यात दसरानिमित्ताने स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. अध्यक्ष गंजी जगनबाबू आणि सरचिटणीस अशोक कांते यांच्या नेतृत्वाखाली वागळे इस्टेटमधील फेरोडी कंपनीच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात ३०० हून अधिक तेलुगू बांधव, महिलावर्ग आणि लहान मुलांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमात सांगीतिक सत्र, आपपसातील भेटीगाठी आणि स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या स्नेहमेळाव्यात एफ-टीएएमचे राष्ट्रीय कोअर टीम सदस्य अंजी रेड्डी यांचा ६७ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या पुढाकारानेच काही दिवसांपूर्वी एफ-टीएएमच्या वतीने ठाण्यात मुख्यमंत्री मदत निधीसाठी दोन लाख ५१ हजारांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला होता. दसराच्या कार्यक्रमाला तेलुगू समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात सरदार पोटम पुरुषोत्तम राव, पैडी जयराज यांचे नातू कासाराम रमेश, बॉलिवूड दिग्दर्शक वेमपार्ला देवेंद्र नायडू आणि आनंद निलायम वृद्धाश्रमाचे अध्यक्ष अलमुरी वेंकटेश्वर गुप्ता यांचा समावेश होता.