मुंबई
शांती नगरात ४०० कन्यांचे पूजन
शांती नगरात ४०० कन्यांचे पूजन
ठाणे ः जयश्री फाउंडेशन आणि के. व्ही. सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महाकन्या पूजनाच्या आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ४०० कन्यांचे पूजन करून त्यांना शालेय उपयोगी साहित्य भेट म्हणून देण्यात आले. संस्थेच्या वतीने आजी आई शाळेतील ज्येष्ठ विद्यार्थिनींसह दानशूर आणि या कन्यांसोबत स्नेहभोजनाचा आनंद देखील घेतला. ठाण्यातील शांती नगर परिसरात हा कार्यक्रम बुधवारी (ता.१) झाला.